पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा ठपका

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

तिघांवर गैरव्यवहाराचा ठपका; आयुक्तांकडून खातेनिहाय चौकशी 

पिंपरी : ठेकेदाराकडून थेट बॅंक खात्यात पैसे स्वीकारणाऱ्या तीन अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. महापालिकेची बदनामी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांचे आर्थिक व्यवहाराचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. 

पिंपरी-चिंचवडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना; महिलेला चटके देत केला अत्याचार

वायसीएम रुग्णालयात साहित्य खरेदीसाठी ठेकेदाराची नियुक्ती केलेली होती. त्याच्याकडून आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रॉय यांनी दोन लाख, बायोमडिकल अभियंता सुनील लोंढे यांनी दोन लाख 43 हजार 208 आणि कनिष्ठ अभियंता सुनील बेळगावकर यांनी 80 हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. ठेकेदाराकडील जमा-खर्च नोंदवही आणि लेखापरीक्षण अहवालातही ही बाब नमूद आहे. या प्रकरणी 16 जून रोजी तिघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सात जुलै रोजी चौकशीसाठी त्रीसदस्यीय समिती नियुक्त केली होती. समितीने सात ऑगस्ट रोजी आयुक्तांकडे अहवाल दिला आहे. त्यानुसार खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नागरी सेवा वर्तणूक नियमानुसार, कर्तव्यात नितांत सचोटी व कर्तव्य परायणता न ठेवता कसूर केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग करून गैरवर्तन केले आहे, असा ठपका तिघांवर ठेवण्यात आला आहे. डॉ. रॉय यांच्याकडील आर्थिक अधिकार काढण्यात आले आहेत. तर अन्य दोन अभियंत्यांकडील काम काढून केवळ तांत्रिक स्वरुपाचे काम त्यांना देण्यात यावे, असे आदेशात म्हटले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad municipal corporation's health medical officers blamed for misconduct