Shrirang Barne : मावळात महायुतीच्या वतीने श्रीरंग बारणे यांना उमेदवारी; शिवसेना शिंदे गटातर्फे पहिल्या यादित अधिकृत घोषणा

मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने शिवसेना (एकनाथ शिंदे गट)तर्फे खासदार श्रीरंग बारणे यांचीच उमेदवार गुरुवारी (ता. २८) अधिकृतपणे घोषित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे.
nomination of Shrirang Barne Maval Mahayuti First list announcement by Shiv Sena Shinde politics
nomination of Shrirang Barne Maval Mahayuti First list announcement by Shiv Sena Shinde politicsSakal

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने शिवसेना (एकनाथ शिंदे गट)तर्फे खासदार श्रीरंग बारणे यांचीच उमेदवार गुरुवारी (ता. २८) अधिकृतपणे घोषित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे.

त्यामुळे आता मावळ मधील महायुतीच्या उमेदवाराच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. उद्धव ठाकरें यांच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे यांनी मशाल हाती घेतली आहे. तर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे हेच मैदानात असणार आहेत. त्यामुळे दोन्ही शिवसेना आमने सामने लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेच्या फुटीनंतर मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राज्यातील आणि मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली.

मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांनीही जोरदारपणे दावा केला होता. त्यामुळे खासदार बारणे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.

परंतु; मावळमध्ये खासदार श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाणावर लढतील, हे स्पष्ट झाले आहे. मावळमध्ये आता महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे संजोग वाघेरे विरुद्ध महायुतीच्या वतीने शिवसेना (एकनाथ शिंदे) तर्फे बारणे यांच्यात राजकीय लढत रंगणार आहे.

बारणे यांची नगरसेवक ते दोन वेळा खासदार

खासदार श्रीरंग बारणे पिंपरी चिंचवड महापालिकेत पाच वेळा नगरसेवक पदावर निवडून आले आहेत. त्यांनी महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते या पदांसह कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अशी पदे भूषविली आहेत.

मागील २०१४ व २०१९ मध्ये सलग दोन वेळेला मावळच्या जनतेने बारणे यांना शिवसेनेच्या वतीने खासदार निवडून दिले आहे मागील २०१९ च्या निवडणुकीत पार्थ पवार असताना देखील त्यांना दोन लाख १५ हजार ९१३ मतांचे मताधिक्य मिळाले होते. दहा वर्षात बारणे आठवेळा संसदरत्न, एकवेळा महासंसदरत्न व ळक वेळा संसद विशेषरत्न पुरस्कार प्राप्त केला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीला महायुतीचा उमेदवार म्हणून सामोरे जात असताना शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द खरा केला. त्यामुळे त्यांचे व महायुतीतील नेत्यांचे मी आभार मानतो. कामाच्या व जनसंपर्काच्या माध्यमातून मला खात्री आहे की, येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मी तिसऱ्यांदा विजयी होऊन लोकसभेत पोहचेल.

- श्रीरंग बारणे, उमेदवार, महायुती-शिवसेना (एकनाथ शिंदे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com