esakal | विद्यार्थ्यांचे बॅंक खातेच नाही तर पैसे कुठे पाठविणार
sakal

बोलून बातमी शोधा

money

विद्यार्थ्यांचे बॅंक खातेच नाही तर पैसे कुठे पाठविणार

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी - शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत उन्हाळी सुटीच्या कालावधीतील लाभ थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचे आदेश देण्यात आले होते. मात्र, मुख्याध्यापकांच्या अनास्थेमुळे केवळ ५० टक्के विद्यार्थ्यांचे बॅंक खाते अद्याप उघडण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी विद्यार्थी लाभापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहाराची रक्कम कशी मिळणार असा प्रश्‍न पालकांकडून उपस्थित होत आहे.

शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना पोषण आहारामध्ये केवळ तांदूळ वाटप केला जात आहे. २०२१ मधील उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित न करता तो अनुदान स्वरूपात थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार होते. यासाठी शहरातील ‘शापोआ’ योजनेस पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांची शंभर टक्के बँक खाते उघडण्यात यावेत, त्यासाठी सर्व पालकांनी पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड हे पालकांच्या बँक खात्याशी लिंक करायचे होते. तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे बँक खाते काढण्यात यावे, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालकांकडून दिले होते. या सुटीतील ३५ दिवसांचे अनुदान पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी १५६ रुपये आहे. तर, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २३४ रुपये आहे.

हेही वाचा: चिंचवडमध्ये महिलेला मारहाण; तिघांवर गुन्हा

नऊ जुलैपर्यंत बँक खात्याची सर्व माहिती अद्ययावत करून जिल्हास्तरावर जतन करण्यात यावी. बँक खाते उघडण्यास शाळेने संबंधित पालकांना आवश्यक ती मदत करण्याचे आदेश आपल्या स्तरावरून सर्व शाळांना देण्यात आले होते. दरम्यान मे महिन्यानंतर पुन्हा पोषण आहारातील तांदळचा पुरवठा होत आहे. मात्र, एका महिन्यासाठी खाते उघडण्यासाठी खूप धावपळ आणि धडपड करावी लागली. त्यामुळे शाळांकडून मुलांची अद्याप खाते उघडण्यात आली नाही. ज्यांनी खाती उघडली आहेत, त्यांच्या खात्यावर अद्याप पोषण आहाराची रक्कम जमा झाली नसल्याचे पालकांनी सांगितले.

‘अनेक पालक परगावी गेलेले आहेत, ते अद्याप परतलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्याचे बॅक खाते उघडण्यात अडचणी येत आहेत. त्याबरोबरच बहुतांश शाळांमधून विद्यार्थ्यांची बॅंक खाते उघडण्यात आलेले नाहीत.’

- सचिन देशमुख, समन्वयक, शालेय पोषण आहार

loading image
go to top