कुख्यात वाळू तस्कर चिंचवडमध्ये जेरबंद; 4 जिल्ह्यांमध्ये होती 'शूट ग्रुप'टोळीची दहशत

Notorious sand smuggler arrested in Satara for carrying pistol
Notorious sand smuggler arrested in Satara for carrying pistol

पिंपरी : पिस्तूल बाळगल्याप्रकरणी साताऱ्यातील कुख्यात वाळू तस्कराला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून चार पिस्तूल व  दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. तर आणखी एकाला अटक करून त्याच्याकडून एक पिस्तूल व दोन काडतुसे जप्त केली आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोमनाथ उर्फ सोमाभाई रमेश चव्हाण (वय 30, रा. कालगाव, ता. कराड, जि. सातारा ) असे वाळू तस्कराचे नाव आहे. मागील महिन्यात गुन्हे शाखेने पिस्तूल विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केले. त्यांच्याकडून 42 पिस्तूल व 64 काडतुसे जप्त केली. या तपासात आणखी नावे निष्पन्न झाली. त्यामध्ये सोमनाथ चव्हाण याचे नाव आले. त्याला उंब्रज पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना अटक केली होती. या गुन्ह्यात तो सातारा मध्यवर्ती कारागृहात होता. दरम्यान, त्याला कारागृहातून गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. 

'नासा'ला जमलं नाही ते 'आयुका'नं करून दाखवलं; अत्यंत दूरच्या दीर्घिकेचा घेतला शोध

आरोपी सोमनाथ हा कुख्यात वाळू तस्कर असून त्याची सातारा परिसरात 'शूट ग्रुप' नावाची गुन्हेगारी टोळी आहे. त्याची सातारा, सांगली, कोल्हापूर व ठाणे जिल्ह्यात दहशत आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे अठरा गुन्हे दाखल आहेत. 2016 मधील निगडीतील गुंड कृष्ण डांगे उर्फ केडी भाई याच्या खून प्रकरणात चव्हाण मुख्य आरोपी होता. 

Unlock 4.0 : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याला 'एवढ्याच' नागरिकांची पसंती; सर्व्हे काय सांगतो पाहा

तसेच पिस्तूल विक्रीच्या रॅकेटमध्ये संतोष चंदू राठोड (वय 23, रा. तळेगाव दाभाडे ) याचेही नाव निष्पन्न झाले. त्याला लोणावळा पोलिसांनी खुनाच्या  गुन्हात अटक केली होती. तो येरवडा कारागृहातून बाहेर येताच पोलिसांनी त्याला चिंचवड येथून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com