'सांगितले 30 पण दिले 5 हजार', दीड महिन्यातच कामावरून काढलेल्या जम्बोच्या परिचारिकांची व्यथा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

राज्य सरकार, पीएमआरडीए, पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या संयुक्तपणे नेहरूनगरच्या अण्णासाहेब मगर स्टेडियम मैदानात 800 बेडचे जम्बो रुग्णालय एक सप्टेंबरपासून कार्यान्वित केले आहे. या रुग्णालयासाठी अकरा महिन्याच्या करारावर परिचारिका व वॉर्ड बॉयची 'जम्बो' भरती केली. परंतु दीड महिन्यातच झपाट्याने शहरातील बाधितांची संख्या कमी झाली.

पिंपरी : बुलडाणा, अकोल्याहून आम्ही आलो आहोत. परिचारिका म्हणू बारा- बारा तास 'ड्यूटी' केली. 30 हजार रुपये वेतन मिळणार असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात हातात केवळ 5 हजार रुपये टेकवले. अकरा महिन्याचा करार होता. परंतु दीड महिन्याचा आताच आम्हाला कामावरून काढून टाकल्याचे महापालिकेच्या नेहरूनगर जम्बो रुग्णालयातील परिचारिका सांगत होत्या. अशा स्थितीत आम्ही कोणाकडे दाद मागायची? असा प्रश्‍न त्यांनी केला आहे. दुसरीकडे ठेकेदाराने आमच्याच खिशातून आतापर्यंत वेतन दिले असून प्रशासनाच्या सांगण्यावरून काढून टाकल्याचे सांगत प्रशासनाकडे बोट दाखवले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य सरकार, पीएमआरडीए, पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या संयुक्तपणे नेहरूनगरच्या अण्णासाहेब मगर स्टेडियम मैदानात 800 बेडचे जम्बो रुग्णालय एक सप्टेंबरपासून कार्यान्वित केले आहे. या रुग्णालयासाठी अकरा महिन्याच्या करारावर परिचारिका व वॉर्ड बॉयची 'जम्बो' भरती केली. परंतु दीड महिन्यातच झपाट्याने शहरातील बाधितांची संख्या कमी झाली. सध्या या रुग्णालयात 300 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असल्याने महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा धडाका लावला आहे. यात जिल्ह्याबाहेरील कर्मचारी भरडले जात आहेत. 15 दिवसांपासूनच त्यांचे काम थांबवले होते. रुग्णालय संचालनालयाचे काम मेडब्रो एजन्सी करीत आहेत. बेस्ट एजन्सीने मनुष्यबळ पुरवले आहे. 

ठेकेदार म्हणतोय प्रशासनाने बिल दिले नाही 
या रुग्णालयात 400 जणांची नेमणूक केली. त्यांना किमान कायद्यानुसार वेतन दिले आहे. प्रशासनाकडून अद्याप बिल मिळाले नाही. रुग्ण कमी झाल्याने प्रशासनाच्या सांगण्यावरूनच 300 पैकी 80 परिचारिका आणि 80 पैकी 30 वॉर्ड बॉय काढून टाकले आहेत. या रुग्णालयाचे डीन संग्राम कपाले यांनी "क्वॉलिटी कंट्रोल' परीक्षा घेतली. जे नापास झाले त्यांना काढून आतापर्यंत आम्ही स्वत:च्या खिशातून 70 टक्के वेतन दिले आहे. सध्या एका हॉटेलमध्ये त्यांना ठेवले असून त्यांचा खर्च प्रशासन उचलत आहे. प्रशासनाने अद्याप बिल दिले नसल्याचे ठेकेदार तेजींदरसिंग अहलुवालिया यांनी सांगितले. 

पुणे-दौंड लोकल उद्यापासून सुरू होण्याची शक्यता
 

मनसेच्या कार्यकर्त्यांचे कोरोना सेंटरवर आंदोलन 
जम्बो रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या बॅगा फेकून देत हाकलून दिल्याप्रकरणी मनसेच्या पदाधिकारी आज (ता.20) दुपारी रुग्णालयावर मोर्चा काढून ठेकेदाराला जाब विचारला.यावेळी शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले (मनसे ), शहर सचिव रूपेश पेठकर, महिला शहराध्यक्षा अश्‍विनी बांगर, उपशहराध्यक्षा अनिता पांचाळ, शहर उपाध्यक्ष राजू सावळे, सीमा बेलापूरकर, मयूर चिंचवडे, दक्षता क्षीरसागर, हेमंत डांगे, विशाल मानकरी, दत्ता देवतरसे आदींनी सहभाग घेतला. 

 

पुणे-दौंड लोकल उद्यापासून सुरू होण्याची शक्यता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nurses fired within a month and a half From Jumbo