
राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आल्याचे समजताच घोळवे यांनी त्वरित 'ऍण्टी चेंबर'मध्ये दडून बसले.
पिंपरी : महापालिकेच्या महासभेत उपमहापौर केशव घोळवे यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात आक्षेपार्ह विधान केले. त्याबाबत त्यांनी शेतकऱ्यांची त्वरित माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने उपमहापौरांच्या केबिनमध्ये जाऊन केली. त्यावर घोळवे यांनी 'ऍण्टी चेंबर'चा आसरा घेतला आणि बाहेर येण्यास नकार दिला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मिसाळ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोळवे यांच्या खुर्चीला शेतीफळांचा हार घालून जाहीर निषेध केला.
- म्हाडाच्या 5647 सदनिकांसाठी अर्ज नोंदणी उद्यापासून; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी पाकिस्तान आणि चीनच्या पाठबळावर प्रतिव्यक्ती 300 रुपये देऊन माणसे आणल्याची मुक्ताफळे उपमहापौर घोळवे यांनी मंगळवारी भर सभेत उधळली. त्याचे पडसाद महापालिकेत उमटले. त्यांच्या वक्तव्याचा निषेध सामान्य नागरिकांनीदेखील निषेध नोंदवला. महापालिकेत उपमहापौरांनी देशभरातील तमाम शेतकऱ्यांचा अवमान केला आहे, त्यांनी शेतकऱ्यांची त्वरित माफी मागावी. अन्यथा त्याप्रकरणी त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने उपमहापौरांच्या केबिनमध्ये जाऊन केली.
- मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाकडून निर्णय झाला, न्याय नाही : पासलकर
राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आल्याचे समजताच घोळवे यांनी त्वरित 'ऍण्टी चेंबर'मध्ये दडून बसले. त्यावर राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी घोळवे यांनी बाहेर येऊन कालच्या विधानाबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. त्यावर घोळवे यांनी बाहेर येण्यास नकार दिला. त्यानंतर मिसाळ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोळवे यांच्या खुर्चीला शेतीफळांचा हार घालून जाहीर निषेध केला. जोपर्यंत माफी मागितली जात नाही, तोपर्यंत घोळवे यांना महापालिकेत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा मिसाळ यांनी दिला. यावेळी नगरसेवक मयूर कलाटे, पंकज भालेकर, युवकचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर उपस्थित होते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)