esakal | पिंपरी : पंचवीस लाखांची मागितली खंडणी; सातजणांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

पिंपरी : पंचवीस लाखांची मागितली खंडणी; सातजणांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे पदाधिकारी असल्याचे सांगून दहा वर्षे जेलमध्ये पाठविण्याच्या धमक्या देत पंचवीस लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. हा प्रकार रहाटणीतील रामनगर येथे घडला.

हेमंत निवगुणे, कपिल राक्षे, आदित्य जेधे, तानाजी मस्तूद, किरण घोलप, सतीश केदारी, ज्योत्स्ना पाटील अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुरजाराम रूपाराम चौधरी (रा. राव कॉलनी, तळेगाव दाभाडे. मूळ रा. राजस्थान) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: योगींच्या जाहिरातीत कोलकत्याचा उड्डाणपुल; तृणमूलचा आक्षेप

फिर्यादी यांचे रहाटणी येथे किराणा दुकान असून हे येथे फिर्यादी व त्यांचे भाऊ असतात. १० सप्टेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास आरोपी हे फिर्यादी यांच्या दुकानात आले. आपण मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे पदाधिकारी असल्याचे सांगत फिर्यादी व त्यांच्या भावाला दहा वर्षांसाठी जेलमध्ये पाठवण्याची धमकी दिली. तसेच २५ लाखांची खंडणी मागितली. दरम्यान, आरोपींनी धमकावून फिर्यादी यांच्या भावाच्या खिशात असलेले आठ हजार पाचशे रुपये देण्यास भाग पाडले. वाकड पोलिसांनी सातही आरोपींना अटक केली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top