मोशीतील प्रिस्टीन ग्रीनच्या पार्कींगचा दीड वर्षांचा प्रश्न अखेर सुटला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 December 2020

मोशी येथील प्रिस्टीन ग्रीनच्या 4 इमारती बांधून पूर्ण झाल्या आहेत. तर उर्वरित इमारतींचे काम चालूच आहे. या ठिकाणी 388 सदनिकाधारक आहेत. या सदनिकाधारकांच्या पार्कींगचा प्रश्न निर्माण झाला होता.

मोशी(पिंपरी : मोशी येथील प्रिस्टीन ग्रीन सोसायटीच्या पार्कींगचा प्रश्न गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित होता. त्याबाबत नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले. त्यांतर आमदार महेश लांडगे यांनी मध्यस्थी करत संबंधित बिल्डरला कोणाचेही नुकसान न होता प्रश्न सोडविण्याची सुचना दिली. त्यानुसार प्रत्येक सदनिका धारकांना पार्कींग सुविधा देण्याचे बिल्डरकडून मान्य करण्यात आले. 

मोशी येथील प्रिस्टीन ग्रीनच्या 4 इमारती बांधून पूर्ण झाल्या आहेत. तर उर्वरित इमारतींचे काम चालूच आहे. या ठिकाणी 388 सदनिकाधारक आहेत. या सदनिकाधारकांच्या पार्कींगचा प्रश्न निर्माण झाला होता. नियमानुसार सदनिकाधारकांना पार्कींगची सोय करायची असते. मात्र प्रिस्टीन ग्रीन मधील सुमारे 190 सदनिकाधारकानांच पार्कींगची सुविधा दिली होती. या मध्ये दुचाकी, सायकल पार्कींगची सुविधा नव्हती. त्याबाबत सोसायटी सभासद वारंवार पाठपुरावा करत होते. मात्र त्यांची दखल घेतली जात नव्हती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यामुळे सोसायटीच्या सभासदांनी आमदार महेश लांडगे यांची भेट घेऊन त्यांच्या पुढे आपली समस्या मांडली. त्यानुसार आमदार लांडगे यांनी सर्व बाजू एकूण घेऊन तत्काळ हा प्रश्न सोडविला. संबंधित बिल्डरला आमदार लांडगे यांनी सूचना देत कोणाचेही नुकसान न करता प्रश्न सोडविण्याच्या सूचना दिल्या. त्यमुळे बिल्डरकडूनही सकारात्मक प्रतिसाद देत प्रत्येक सदनिकाधारकाला पार्कींगची सोय देण्याचे मान्य केले. 

''शहरात करत असलेल्या सर्व बांधकाम व्यावसायिकांनी आपापल्या बांधकाम प्रकल्पामध्ये सदनिकाधारक नागरीकांना नियमाने ज्या ज्या सुविधा देणे क्रमप्राप्त आहेत. त्या त्या सर्व सुविधा देण्यात याव्यात. नागरिकांना सुविधांसाठी वेठीस धरु नये.''
- महेश लांडगे, आमदार 

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशअर्जास मुदतवाढ 

''नियमानुसार पार्किंग देणे असतानाही आम्हाला दुचाकी व सायकलचीही पार्कींग सुविधा नव्हती. त्याबाबत आमदार महेश लांडगे यांच्याकडे आम्ही प्रश्न मांडले. त्यांनी त्वरित हा प्रश्न सोडविला.''
- संजय गोरड, प्रिस्टीन ग्रीन्स सोसायटी सदस्य.

''दीड वर्ष आम्ही यासाठी पाठपुरावा करत होतो. विषय जटील होऊन बसला होता. महापालिकेकडेही आम्ही पाठपुरावा केला. मात्र हा प्रश्न सुटला नव्हता. त्यांतर आमदार महेश लांडगे यांना आम्ही भेटलो. त्यांच्यामुळे हा प्रश्न सुटला आहे.''
- संजीवन सांगळे, सचिव, चिखली-मोशी-चऱ्होली हौसिंग सोसायटी.

 

Corona Updates: पुण्यात हॉस्पिटलमधील रुग्णांचा आकडा ३ हजारांच्या आत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The one-and-a-half-year-old parking problem at Pristine Greens in Moshi has finally been resolved