ओळखीचा पंडित असल्याचं सांगून तरुणीला 53 हजारांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 February 2021

  • तरुणीच्या बँक खात्यातून 53 हजार रुपये काढून तरुणीची फसवणूक केली. 

पिंपरी : अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनवरील व्यक्तीने ओळखीचा पंडित बोलत असल्याचे भासवले. बँक खात्यात पैसे टाकणार असल्याचे सांगून क्युआर कोड व्हॉट्सअप स्कॅन करायला लावून तरुणीच्या बँक खात्यातून 53 हजार रुपये काढून तरुणीची फसवणूक केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत स्नेहा कैलास राजगुरू (वय 30, रा. आंबेगाव पठार, पुणे) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरुणीची मावशी वेणुनगर, वाकड येथे राहते. रविवारी (ता. 14) फिर्यादी त्यांच्या मावशीकडे आल्या असता, रविवारी दुपारी चारच्या सुमारास तरुणीला अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने आपण तिच्या ओळखीचा पंडित बोलत असल्याचे भासवले आणि तरुणीच्या बँक खात्यात पैसे टाकतो, असे सांगून व्हॉट्सअपवर एक क्युआर कोड पाठवला. पाठवलेला क्यूआर कोड स्कॅन करायला लावून फिर्यादीच्या खात्यातून 52 हजार 993 रुपये काढून फिर्यादीची फसवणूक केली.

राजेंद्र पाटलांनी स्वीकारला पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा पदभार

याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one cheated from girl by withdrawing 53 thousands to scan the qr code on whatsapp