चिंचवडमधील मैलाशुद्धीकरण प्रकल्पात उडी मारून सुरक्षारक्षकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

चिंचवड, लिंकरोड येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मैलाशुद्धीकरण प्रकल्पात उडी मारून एकाने आत्महत्या केली. 

पिंपरी : चिंचवड, लिंकरोड येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मैलाशुद्धीकरण प्रकल्पात उडी मारून एकाने आत्महत्या केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

रवी श्यामराव जानराव (वय 35, रा. पत्राशेड, लिंकरोड, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. जानराव हे मैलाशुद्धीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून कामाला होते. गुरुवारी (ता. 8) दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी मैलाशुद्धीकरण टाकीत उडी मारली. ही बाब तेथील एका नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने आरडाओरडा करीत इतरांना बोलावून घेतले. त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. काही वेळातच जानराव यांना टाकीतून बाहेर काढून उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, ही घटना येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one commits suicide by jumping into a sewage treatment plant in Chinchwad