खंडाळ्यात जुन्या महामार्गावर मोटारसायकल-कारचा अपघात; एकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळ्यात मोटारसायकल आणि कारचा अपघात झाला.

लोणावळा : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळ्यात मोटारसायकल आणि कारचा अपघात झाला. त्यात मोटारसायकल चालक जागीच ठार झाला. अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

भोसरीनंतर आता पिंपरीत ट्रान्सफॉर्मरचा स्फोट 

मुस्किम सलिम शेख (वय १९, रा. भानवज, खोपोली) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारचालक हनुमंत लक्ष्मण किरवे (वय ४२, रा. घनसोली, नवी मुंबई) यांनी पोलिसांत माहिती दिली. 

पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो विस्तारीकरणाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात 

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा पोलिस औट पोस्टजवळ भरधाव मोटारसायकलची (एमएच ४६, बीएच २७७०)  समोरून येणाऱ्या कारला (एमएच ४६, बीक्यू ४१६३) जोरदार धडक बसली. त्यात मुस्किमच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अन्य एक जण गंभीर जखमी झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one death of motorcycle-car accident on old highway in khandala