...अन् अशा प्रकारे १ जूनचा सार्वजनिक वाढदिवस साजरा झाला!

सुवर्णा नवले
Monday, 1 June 2020

- सोशल मीडियावर राष्ट्रीय सार्वजनिक वाढदिवस साजरा 
- फेसबुक फ्रेंड लिस्टमध्येही 'बर्थ डे' यादी फुल

पिंपरी : फेसबुक फ्रेंडलिस्ट व्यापून गेलेल्यांच्या यादीत चक्क आज (१ जून, सोमवार) शेकडो जणांचे वाढदिवस साजरे झाले आहेत, असं म्हणतात की ज्यांना आपल्या वाढदिवसाची तारीखच माहीत नाही, त्या सर्वांची सरकारी दप्तरी १ जून नोंद झाली आहे. त्यामुळे आजचा सामूहिक वाढदिवस सोशल मीडियावर 'राष्ट्रीय सार्वजनिक वाढदिवस' म्हणून जोरदार साजरा झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पूर्वी ज्या आई-वडिलांनी मुले शाळेत घातली. त्या बहुतांश जणांना आपल्या मुलांची जन्म तारीख लक्षात नव्हती. मात्र, शैक्षणिक वर्ष जून महिन्यात सुरू होते. त्यामुळे शिक्षकांनाही दाखल्यावर १ जून ही तारीख लावली. आज बऱ्याच नेटिझन्सने वेगवेगळ्या टॅग लाईन खाली वाढदिवस साजरे केले आहेत. कोणी अखिल भारतीय वाढदिवस, तर कोणी सार्वजनिक वाढदिवस साजरा करून आयुष्य घडविलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. त्यामुळे बऱ्याच तरुणांनी आपल्या आई-वडिलांना देखील अशा हटके शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, काही जणांचे वाढदिवस अनायसे  १ जुनला आले आहेत. त्यामुळे त्यांची देखील त्यात भर सामूहिक वाढदिवसात पडली आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राजकीय मंडळींच्याही हटके शुभेच्छा 

फेसबुकवर बऱ्याच जणांची मोठी यादी असल्याने वाढदिवसाच्या वैयक्तिक शुभेच्छा देणे शक्य नाही, त्यामुळे सगळ्यांनीच एकत्रित शुभेच्छा देऊन पोस्ट शेअर केली आहे. तर काही राजकीय मंडळींनी पूर्ण जिल्हा व तालुक्यात आज जन्माला आलेल्या सर्वांना एकत्रितच शुभेच्छा दिल्या आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one june birthday celebration on social media pimpri chinchwad marathi news