Pune Traffic : भूमकर चौकातील एकेरी वाहतूक बेकायदेशीर; व्यापारी व रहीवाशांचा आरोप

आंदोलनाचा इशारा; भूमकर व विनोदे चौकात केलेली एकेरी वाहतूक बेकायदेशीर असून ती आम्हाला अमान्य
One-way traffic Bhumkar Chowk illegal Allegations of traders and residents pune police
One-way traffic Bhumkar Chowk illegal Allegations of traders and residents pune policesakal

- बेलाजी पात्रे

वाकड : आयटी पार्क हिंजवडीकडे जाणाऱ्या भूमकर चौक, विनोदे चौक व लक्ष्मी चौकातील मार्गावर करण्यात आलेली एकेरी वाहतूक बेकायदेशीर असून ती जनतेला अमान्य असल्याचा आरोप येथील रहिवाशी व व्यापाऱ्यांनी पोलीस, राजकीय पुढारी व मंत्र्यांकडे पत्राद्वारे केला आहे.

One-way traffic Bhumkar Chowk illegal Allegations of traders and residents pune police
Baramati Traffic : बारामतीच्या वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी होणार संयुक्त प्रयत्न

व्यापारी व रहिवाशांनी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह राज्याचे गृह मंत्री, सर्व स्थानिक आमदार, खासदार स्थानिक नगरसेवक व सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे कैफियत मांडली आहे तसेच आठ दिवसाच्या आतकाय तो निर्णय द्यावा अन्यथा तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल त्यास तुम्ही जबाबदार असाल असा इशाराही देण्यात आला आहे.

आम्हा जनतेला वेठीस धरून आपण काय साध्य करू इच्छिता हे कोणालाही ज्ञात होत नाहीये. एकेरी वाहतूक करण्याचा निर्णय बेकायदेशीर आहे. तो आम्हाला मान्य नाही. माणुसकीचा विचार करून कृपया आम्हा जनतेवर निर्णय लादू नये व ताबडतोब जैसे थे परिस्थिती ठेवावी ही विनंती असे पत्रात म्हटलें आहे.

One-way traffic Bhumkar Chowk illegal Allegations of traders and residents pune police
Pune Traffic Police : नो पार्किंगमध्ये वाहन लावताना जरा जपूनच; दंडाची रक्कम डेबिट, क्रेडिट कार्डद्वारेच स्वीकारणार

पत्रातील काही मुद्दे व मागण्या

  • भूमकर व विनोदे चौकात केलेली एकेरी वाहतूक बेकायदेशीर असून ती आम्हाला अमान्य

  • एकेरी वाहतूकीमुळे व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे

  • रहिवाश्यांचीही मोठी गैरसोय सुरू

  • वाहने जोरात असल्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत

  • धरून रास्ता ओलांडावा लागतोय.काही अपघातही झालेत

  • ट्रैफिक जामची परस्थिती पूर्वी सारखीच जैसे थे आहे.

  • किरकोळ कामासाठी दोन किमीचा प्रवास तोही वाहतूक कोंडीतून.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com