शतपावली करायला गेला अन्...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

शतपावली करायला गेला अन् जीव गमावून बसला.

कामशेत : शतपावली करायला गेला अन् जीव गमावून बसला. आई-वडील आणि दोन बहिणी पाठीमागे सोडून तो उमदा तरुण कायमचाच गेला. एकुलत्या एक मुलाच्या जाण्याने आई-वडील हंबरडा फोडून रडत होती. त्यांचा टाहो फोडणारा हंबरडा काळीज हेलावून टाकत होता. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टाकवेतील यश रोहिदास असवले या महाविद्यालयीन युवकाचा शुक्रवारी (ता. 22) रात्री निर्घृण खून झाला. जेवण करून तो शतपावली करायला घराबाहेर पडला. मित्रांसोबत आकाशात चमचणाऱ्या चांदण्यांच्या उजेडात त्यांची शतपावली सुरू होती. चालता-चालता गप्पांची मैफिल रंगली होती. सुख-दु:खाच्या गप्पा मारत असतानाच सरकारी दवाखान्याच्या पुढे जाताच दुचाकीवरून आलेल्या सात ते आठ जणांनी त्याच्यावर केलेल्या निर्घृण हल्ल्यात तो जखमी झाला. उपचारांसाठी दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. 

हेही वाचा- टाकव्यातील त्या तरुणाच्या खूनाचा पाच तासांत छडा; असे सापडले आरोपी

यश तळेगावच्या इंद्रायणी महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत होता. महाविद्यालयीन शिक्षण घेताघेता त्याचा बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचा व्यवसाय सुरू होता. गावच्या राजकारणाची त्याला आवड होती. त्याच्या जनमानसातील संपर्कामुळेच मागील वर्षी झालेल्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत त्याची आई निवडून आली. आईला निवडून आणण्यात त्याचा मोठा वाटा होता. त्याने अनेक मित्र जमवले होते. शुक्रवारची शतपावली त्याच्यासाठी शेवटची शतपावली ठरली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one youth murder at takwe budruk maval today