esakal | लसीकरणाची ऑनलाइन व ऑफलाइन पद्धत होणार बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

लसीकरणाची ऑनलाइन व ऑफलाइन पद्धत होणार बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - नागरिकांची होणारी गैरसोय पाहता, सद्यःस्थितीत लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) देण्यात येणारी टोकन पध्दत बंद (Token Process Close) करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ‘किओक्स’ संगणक प्रणालीद्वारे (Keyox Computer Process) टोकन पद्धतीनुसार राबविण्यात येत आहे. किओक्सअंर्तगत आजपासून (ता.२०) पासून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या संकल्पनेनुसार पालिकेच्या एकूण आठ क्षेत्रीय कार्यालयांमधून टोकन उपलब्ध केले. या टोकन पद्धतीबाबत नागरिकांचा प्रतिसाद पाहूनच किओक्सची संख्या ही वेळोवेळी वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. (Online and Offline Vaccinations will be Discontinued)

केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगातून महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी (वयोगट – १८ ते ४४ व ४५ वर्षांपुढील) मोफत कोविड लसीकरण अभियान राबवीत आहे. नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने व केंद्रांवर टोकन उपलब्ध करून दिले जाते. मात्र केंद्रावर दिल्या जाणाऱ्या टोकन पद्धतीबाबत नागरिकांचा रोष दिसून येत आहे. नागरिकांमध्ये वारंवार वाद विवादाचे प्रसंग उद्भवत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

हेही वाचा: पिंपरी : इच्छुकांना मतदारांचा कैवार

अशी करा किओक्सद्वारे नोंद

नागरिकांनी आठ क्षेत्रीय कार्यालयांपैकी जवळील क्षेत्रीय कार्यालयामध्ये येऊन किओक्समध्ये आपला मोबाईल क्रमांक, जन्म वर्ष, प्रथम अथवा द्वितीय लस नोंद करणे आवश्‍यक आहे. नागरिकांच्या मोबाईल क्रमांकावर उपलब्ध होणारा ओटीपी , किओक्समध्ये नोंदवून नागरिक आपली माहिती समाविष्ट करू शकता. नोंद झाल्यानंतर नागरिकांस किओक्समधून छापील टोकन क्रमांक प्राप्त होईल. तसेच टोकन क्रमांक संदेशाद्वारे नागरिकांस पाठविण्यात येईल. या पद्धतीने नागरिकांची लसीकरणासाठी नोंद झाल्यानंतर शासनामार्फत उपलब्ध होणाऱ्या दररोजच्या डोस संख्येनुसार केंद्रीय पद्धतीने नागरिकांची निवड होईल. संगणक प्रणालीद्वारे संदेश पाठवून नागरिकांनी निवड केलेल्या लसीकरण केंद्रामध्ये बोलावण्यात येईल.

हेही वाचा: पिंपरी : मागील इयत्तेची पुस्तकेच नाहीत

तरच दूसरा डोस

द्वितीय डोसबाबत ज्या नागरिकांचे कोविशिल्ड या लसीकरणासाठी ८४ दिवस व ‘कोव्हॉक्सीन’ लसीकरणाचे २८ दिवस पूर्ण झाले असतील तरच नागरिकांना दूसरा डोस देण्यात येईल. या दिवसांची पुर्तता झाली नसल्यास संबंधित केंद्रावर नागरिकांना डोस नाकारण्यात येणार आहे. नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय संबंधित मोबाईल क्रमांक नागरिकांस टोकन घेण्यासाठी वापरण्यात येणार नाही. नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर मोबाईल क्रमांक घरामधील इतर सदस्यांना टोकन घेण्यासाठी नागरिक वापरू शकतात. तसेच केंद्रीय पद्धतीने लसीकरणासाठी निवड झालेल्या नागरिकांस प्रमाणित केलेल्या लसीकरणासाठी जाणे शक्य नाही, झाल्यास संबंधित नागरिकांस पुन्हा नव्याने टोकन घेऊन प्रतीक्षा यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करावे लागेल. लसीकरण केंद्रावरती नागरिकांना प्राप्त झालेला एसएमएस अथवा किओक्सद्वारे दिलेले टोकन प्रत दाखवून त्याबाबतची खात्री झाल्यानंतरच लसीकरण करण्यात येईल.

loading image