बँकेतून बोलत असल्याचे सांगून निगडीत आठ लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून ओटीपीची माहिती घेत ज्येष्ठाची आठ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार निगडी येथे उघडकीस आला. 

पिंपरी : बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून ओटीपीची माहिती घेत ज्येष्ठाची आठ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार निगडी येथे उघडकीस आला. 

शिवराम गोपाळ वैद्य (वय 57, रा. सुभश्री सोसायटी, निगडी गावठाण) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीला फोन करून आपण बांद्रा ऑफिसमधील आयसीआयसीआय बॅंकेतून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे डेबिट कार्ड ब्लॉक होणार असून, तुमचे फिंगर प्रिंट आवश्‍यक आहेत. त्यासाठी आमच्या ऑफिसमधून तुमच्या घरी काही लोक येतील. त्याआधी तुमच्या मोबाईलवर आलेल्या मेसेजची पूर्ण माहिती द्या, असे आरोपीने सांगितले.

चिखलीत घरावर दगडफेक; लाकडी दांडके, कोयत्याने तोडफोड 

फिर्यादीने त्यांच्या मोबाईलवर आलेल्या ओटीपीची माहिती समोरील व्यक्तीला सांगितली. त्यानंतर आरोपीने त्यांच्या अकाउंटवरून ऑनलाइनद्वारे सात लाख 98 हजार 998 रूपये परस्पर ट्रान्सफर करून घेत फिर्यादीची फसवणूक केली. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online fraud of eight lakh in nigadi