esakal | 'या' कलाशिक्षकांनी कोरोनामुक्तीसाठी काय केलंय... एकदा बघा...
sakal

बोलून बातमी शोधा

'या' कलाशिक्षकांनी कोरोनामुक्तीसाठी काय केलंय... एकदा बघा...

- कोरोनामुक्तीसाठी संदेश देणारी चित्रे रेखाटली

- पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना पाठविणार चित्रे

'या' कलाशिक्षकांनी कोरोनामुक्तीसाठी काय केलंय... एकदा बघा...

sakal_logo
By
श्रावण जाधव

मोशी : 'कधी सुटेल हा विळखा कोरोनारुपी राक्षसाचा, पीके शेतातच गेली वाया', 'सुटला बांध शेतकरीराजाचा घरातच राहून घेऊ काळजी, तेव्हा सुटेल हा विळखा कोरोना राक्षसाचा', अशी कोरोनामुक्तीच्या दृष्टीने विविध स्लोगन असलेली पोस्टर चित्रांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील 70 कलाशिक्षकांनी आपल्या जादूई कुंचल्यातून रेखाटली आहेत. त्यातून समाजप्रबोधन करीत कोरोना जनजागृती अभियानात आपला खारीचा वाटा उचलला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्र व राज्य सरकार करीत असलेल्या समाजप्रबोधनाच्या कामात आपल्या हातून एखादे छोटेसे कार्य घडावे, यासाठी पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ जिल्हा शाखा पुणे, या संघटनेतर्फे 'देशावरील आलेले कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो' या विषयावर कोरोनामुक्ती जनजागृती अभियानाअंतर्गत नुकत्याच जिल्हास्तरीय कलाध्यापक ऑनलाईन चित्रकला पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये फक्त बारा दिवसांच्या कालावधीमध्ये पुणे जिल्हातील सत्तरहून अधिक कलाध्यापकांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये साहित्याची जुळवाजुळव करीत या सहभाग घेतला. त्यात गावी गेलेल्या अनेक कलाध्यापकांनीही सहभाग घेतला. 

लॉकडाउनमध्ये 'मेंटल वेलबीइंग'मध्ये पुणेकर पाचव्या क्रमांकावर

ज्येष्ठ निवृत्त कलाध्यापक संजय कुंभार (आकुर्डी-प्राधिकरण), शिवराम हाके (चिंचवड) व रमेश गाढवे (मोरगाव) या कलाशिक्षकांनी प्रत्येकाच्या घरूनच ऑनलाइन पद्धतीने परिश्रम केले. या चित्रांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः मास्क घालून सोशल डिस्टंन्सिंग पाळत केंद्रीय बैठका घेत आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाइन नागरिकांशी एक कुटुंब प्रमुख म्हणून संवाद साधत घरीच राहण्याची हात जोडून विनंती करीत आहेत, असे दाखवले आहे. एका चित्रात शेतकरी राजावर अगोदरच असलेला कर्जाचा बोजा अन् कोरोनामुळे शेतीमाल शिल्लक राहिल्याने मिळत असलेली शिक्षा. आणखी दुसर्‍या चित्रात कोरोनापासून रुग्णांना वाचवणारे डॉक्टर व नर्स, असे आरोग्य कर्मचारी व संरक्षणाचे काम करणाऱ्या पोलिसांच्यावरच होणाऱ्या हल्ल्यांमुळे त्यांना होणारा त्रास, अशी अनेक चित्रे रेखाटली आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ही सर्व चित्रे समाजप्रबोधनपर जाहिरातींमध्ये वापरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना संघटनेच्या वतीने पाठविण्यात येणार आहेत. या सहभागी चित्रांमधून विविध तालुक्यातील प्रथम 5 पारितोषिके, तर अन्य 7 कलाध्यापकांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली आहेत. अशा एकूण 12 पारितोषिक प्राप्त कलाध्यापकांना महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ जिल्हा शाखा पुणे यांच्या वतीने राज्य कोरोनामुक्त झाल्यावर उपक्रमशील आदर्श कलाध्यापक या पुरस्काराने; तर सर्व सहभागी कलाध्यापकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

या स्पर्धेमध्ये अनुक्रमे 
- प्रथम क्रमांक : चंद्रकांत जाधव, मुरारबाजी देशपांडे विद्यालय, वाठार (ता. भोर), 
- द्वितीय क्रमांक : रमेश खडबडे, संत तुकाराम विद्यालय, देहू 
- तृतीय क्रमांक :  स्वाती देशपांडे, एसपीएम इं. मे. स्कूल, निगडी
- चतुर्थ क्रमांक :  संदिप भालेराव, न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी (ता. आंबेगाव)
- पाचवा क्रमांक : सुनील नेटके, श्री मंगेश मेमोरियल इं. मे. स्कूल, दौंड
- उत्तेजनार्थ : वैशाली दामकोंडवार (वैशाली ड्रॉईंग क्लासेस शिवणे, ता. मुळशी), शंकर पऱ्हे (भारत इंग्लिश स्कूल, शिवाजीनगर, पुणे), फाल्गुनी देशपांडे (झैनाबाई इं. मे. स्कूल, काटफळ, ता. बारामती), ट्विंकल देशमुख (प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, लाखेवाडी, इंदापूर), बाळासाहेब साबळे (सरस्वती विद्यालय, उदापूर जुन्नर), शंकर वाघमारे (ज्योतिर्लिंग हायस्कूल, गुळूचे, ता. पुरंदर), मच्छिंद्र करंजकर (न्यू इं. स्कूल, कवठे यमाई, ता. शिरुर), असे पारितोषिक प्राप्त कलाशिक्षक आहेत. 

कोरोनामुक्ती जनजागृती अभियान जिल्हास्तरीय कलाध्यापक पोस्टर चित्रकला, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व जिल्हा कलाध्यापक संघाच्या जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी सतत ऑनलाइन राहत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. 

पुणे जिल्हा कलाध्यापक संघाच्या माध्यमातून स्पर्धेची ऑनलाइन कल्पना मांडून नियोजनही केले. लॉकडाउनमुळे सर्व बंद असल्याने स्टेशनरीही उपलब्ध नव्हती. त्यामुळे इच्छा असूनही अनेक कलाध्यापकांना सहभागी होता आले नाही. चित्रांचे परीक्षण ही एक कसोटीच होती, त्यात मोबाइल किंवा टॅबमध्येच चित्रे असल्याने निरीक्षणास एका वेळी एकच चित्र दिसायचे ही कसरत होती. परीक्षकही एकमेकांपासून दुर होते. अखेरीस एकमेकांमध्ये सुसूत्रता आणून चित्रकार शिवराम हाके, रमेश गाढवे आणि मी (संजय कुंभार) तिघांनी ही जबाबदारी पार पडली. सर्व विजेत्यांचे व सहभागी चित्रकारांचे अभिनंदन.

- संजय कुंभार, ज्येष्ठ चित्रकार 

महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे ही सरकारमान्य एससीईआरटी प्रमाणित कलाध्यापक संघटना आहे. कला विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी संघटना आहे. संघटनेतील कलाध्यापक स्वतःसह विद्यार्थीही चालू घडामोडींनुसार आपले ज्ञान अद्ययावत रहावे, यासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवत असतात. त्यातीलच हाही एक प्रशासनास मदत म्हणून उचललेला खारीचा वाटा असलेला समाजप्रबोधनपर कोरोना मुक्ती जनजागृती अभियान जिल्हास्तरीय कलाध्यापक चित्रकला स्पर्धा उपक्रम होय.

- पी. आर. पाटील, अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे

loading image