esakal | पुणेकर नेहमीप्रमाणेच निवांत; लॉकडाऊनमुळं मु्ंबईकर मात्र टेन्शनमध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

Pune ranks fifth in Citizens Mental Wellbeing

- टीआरए संस्थेचे 'मानसिक निरोगीपणावर संशोधन
- लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये नागरिकांच्या 'मेंटल वेलबीइंग'ची गुणवत्ता

पुणेकर नेहमीप्रमाणेच निवांत; लॉकडाऊनमुळं मु्ंबईकर मात्र टेन्शनमध्ये

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : देशभरात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमधली चिंता सुद्धा वाढत आहे. लोकडाऊनच्या काळात बाहेर न पडणे, रोज नवीन काय करायचे, नोकरी जाण्याची भीती, आर्थिक अडचण कशी सुटेल ? आपल्याला हा संसर्ग झाला तर ? अशा असंख्य प्रश्नांमुळे नागरिकांचा मानसिक ताण वाढत आहे. दरम्यान या संदर्भात टीआरए संस्थेच्या 'कोविड मेंटल वेलबीइंग इंडेक्स' विभागातर्फे नुकतेच एक संशोधन करण्यात आले. त्यानुसार पुणे शहरातील नागरिकांचा मानसिक ताणतणाव कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच यामध्ये इतर शहरांच्या तुलनेत पुणे पाचव्या क्रमांकावर आहे. राज्यात सर्वाधिक मुंबईतील नागरिक ताण-तणावाखाली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
संपूर्ण देशात असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत टीआरए रिसर्च या 'कन्झ्युमर इन्साइट्स आणि ब्रँड अनॅलिटीक्स कंपनी'ने देशभरातील 16 शहरांमध्ये नागरिकांचा 'मेंटल वेलबीइंग' (मानसिक निरोगीपणा) सर्वे करुन एक अहवाल तयार केला होता. यामध्ये राज्यातून पुणे, नागपूर आणि मुंबई या तीन शहरांचा समावेश आहे. या अहवालानुसार पुण्यातील नागरिकरांची 'मेंटल वेलबीइंग' गुणवत्ता 72 टक्के, नागपूरची 55 टक्के तर मुंबई शहरातील मेंटल वेलबीइंग गुणवत्ता ही 28 टक्के इतकी आहे. तसेच मेंटल वेलबीइंगमध्ये 84 टक्के गुणवत्ता प्राप्त करून गुवाहाटी शहर देशात प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर दिल्ली-एनसीआर, इंदोर आणि कोइम्बतूरची गुणवत्ता अनुक्रमाणे 78 टक्के, 75 टक्के आणि 73 टक्के इतकी आहे.

- पुण्यात पेट्रोल-डिझेल बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काढले नवीन आदेश; काय ते वाचा
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना या संकटाच्या काळात नागरिकांच्या मानसिक आरोग्यावरील परिणाम यावर भर देण्यात आला. मानसिक त्रासाचा सामना करण्याची क्षमता अर्थातच व्यक्तीच्या मनावर अवलंबून असते. तसेच घनदाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी वेगाने या संसर्गाचा प्रसार होत असल्याने अशा परिस्थितीमध्ये नागरिकांची चिंता वाढली आहे. हेतूने हे संशोधन करण्यात आले आहे. तसेच मोठ्या शहरांच्या तुलनेत लहान शहरांतील नागरिकांमध्ये मानसिक त्रास कमी असल्याचे यातून स्पष्ट होत आहे, अशी माहिती टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौली यांनी दिली.

- पुण्यात पेट्रोल-डिझेल बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काढले नवीन आदेश; काय ते वाचा

विषाणूचा प्रादुर्भाव, त्यामुळे कुटुंबीयांचे आरोग्य, लॉकडाऊन, कामाच्या बाबतीतील अस्थिरता, देशाच्या आरोग्यावर आणि अर्थकारणावर होणारा परिणाम यांबाबतचे निरीक्षणे करून या संशोधनातील गुणवत्ता नोंदविण्यात आली. हे सर्वेक्षण करताना नागरिकांमध्ये सध्याच्या कठीण परिस्थितीशी संबंधित चिंता हाताळण्याच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

- हुश्श! सुटलो रे बाबा एकदाचा : पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची पहिली बस रवाना
"मोठ्या शहरांमध्ये श्रमिक मजुरांची संख्या सुद्धा जास्त आहे. या कठीण काळात आपापल्या कुटुंबापासून दूर असल्याने त्यांच्या चिंतेचे करण साहजिक आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य ठीक आहे की नाही, काम नसल्यामुळे त्यांना आर्थिकमदत न करता येणे हे देखील चिंतेचे कारण ठरत आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. संकटाच्या परिस्थितीला कशा प्रकारे हाताळायचे हे त्यांच्या व्यक्तिमत्वावर ठरतं."
- डॉ. कृष्णा कदम, वरिष्ठ मनोविकृतीशास्त्रतज्ञ- ससून रुग्णालय

- विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा अर्ज भरण्याबाबत पुणे विद्यापीठाने केली महत्त्वाची घोषणा!
 

मानसिक त्रासाचे कारण 
मुंबईनंतर लखनऊ शहर हे 'मेंटल वेलबीइंग' गुणवत्तेमध्ये खालून दुसऱ्या क्रमांकावर आहे. या शहरातील गुणवत्ता 36 टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांना आपली नोकरी, आरोग्य आणि कुटुंबाची चिंता सतावते. तर काही नागरिकांना आपल्या कर्जाचे हप्ते, गुंतवणूक, उद्योग आणि शिक्षण आदी गोष्टी मानसिक तत्रासाला कारणीभूत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ सांगत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

loading image
go to top