पिंपरीमधील हॉटेल व रेस्टॉरंट सुरू झालेत का?

corona-u.jpg
corona-u.jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायावरचे ग्रहण अद्यापही सुटले नाही. शहरातील केवळ हॉटेलिंग लॉज व गेस्ट हाऊस 33 टक्के क्षमतेत सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार लॉज व्यावसायिकांनी बुधवारी (ता.8) लॉज स्वच्छता करून सॅनिटायजरने फवारणी केली. मात्र, या निर्णयाबाबतही हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांमध्ये गोंधळ सुरु असल्याचे चित्र समोर आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात चार हजारांहून अधिक हॉटेल व्यावसायिक आहेत. दोनशेच्यावर लॉज व्यावसायिक आहेत. बऱ्याच जणांचा हॉटेल व लॉज हा व्यवसाय एकत्रित सुरु आहे. त्यामुळे लॉज ग्राहकांना भाडे तत्वावर देताना हॉटेल सुरु असणे देखील गरजेचे आहे. मात्र, या सर्वांसाठी कूक, वेटर व स्वच्छता कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. सर्वांना कामावर रुजू होणे अत्यावश्‍यक आहे. मात्र, 33 टक्‍के क्षमतेत एवढ्या मनुष्यबळाचा पगारही निघणार नाही. त्यामुळे या व्यवसायावरही गंडातर येणार असल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. काही व्यावसायिकांनी लॉज न उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळपासून शहरातील काही ठिकाणी हॉटेल व लॉज पूर्णत: सॅनिटायज करण्याचे काम सुरु करण्यात आले. शिवाय येणाऱ्या प्रत्येकाची प्रवासाची माहिती व तापमानाच्या तपासणीसाठी यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांना दक्षता कशी घ्यावी याबद्दल सूचना देण्यात आल्या. काही ठिकाणी पार्सल सुविधा सुरु असल्याने तेथे देखील स्वच्छतेच्या दृष्टीने काळजी घेतली जात आहे.

हॉटेल व्यावसायिक उल्हास शेट्टी म्हणाले, 'या हॉटेलांमध्ये केवळ लॉज सुरु ठेवून हॉटेलिंग बंद ठेवणे कठीण आहे. मनुष्यबळाची कमतरता आहे. शहर व शहराबाहेर अद्यापही कोरोना संसर्ग असल्याने कंटेन्मेंट झोनमध्ये शहराचा बराच परिसर व्यापलेला आहे. त्यामुळे लॉजमध्ये येणाऱ्यांची संख्या कमी असणार आहे. सर्वाधिक महसूल हा आजही हॉटेल व्यावसायिकांचा आहे. तरी देखील शासनाने याबद्दल गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. सोशल डिस्टन्सचे नियम पाळून हॉटेल व्यवसाय सुरळीत होणे आवश्‍यक आहे. शासन मात्र, या व्यावसायिकांबाबत कठोर निर्णय घेत आहे.'

हॉटेल व रेस्टॉरंटचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी म्हणाले, 'तीन महिन्यांपासून हॉटेल व्यवसाय ठप्प आहे. सध्या ग्राहक देखील तुलनेत कमी असेल. शासन निर्णयातही अस्पष्टता जाणवत आहे. ठोस निर्णय घेऊन 33 टक्के क्षमतेत काम करणे अवघड आहे. हॉटेलची इलेक्‍ट्रिसिटी, गॅस व इतर देखभाल दुरुस्तीसाठी खर्च परवडत नाही. शासनाने लवकरात लवकर या व्यवसायबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून हॉटेल व रेस्टॉरंट सुरु करण्यास मुभा द्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com