कोरोनाबाधिताच्या दिशाभुल करणा-या पत्त्यामुळे धास्तावले अवघे तळेगाव

गणेश बोरुडे
बुधवार, 27 मे 2020

पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका बासष्ट वर्षीय कोरोना बाधित रुग्णाने दिशाभुल करणारी माहीती दिली. कोरोना चाचणी अहवालावरील पत्त्यावर तळेगावचे नाव असल्यामुळे अख्खे तळेगाव धास्तावले. मंगळवारी (ता.२६) दुपारनंतर संबंधित रुग्णाचे तळेगाव कनेक्शन शोधण्यासाठी नागरिकांसह प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली.

तळेगाव स्टेशन - पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका बासष्ट वर्षीय कोरोना बाधित रुग्णाने दिशाभुल करणारी माहीती दिली. कोरोना चाचणी अहवालावरील पत्त्यावर तळेगावचे नाव असल्यामुळे अख्खे तळेगाव धास्तावले. मंगळवारी (ता.२६) दुपारनंतर संबंधित रुग्णाचे तळेगाव कनेक्शन शोधण्यासाठी नागरिकांसह प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना चाचणी अहवालावर नोंद केलेल्या पत्त्यावर केवळ तळेगाव स्टेशनच्या यशवंतनगरचे नाव असल्यामुळे ती व्यक्ती राहत असलेली इमारत आणि संदर्भित पत्ता शोधणे जिकीरीचे होते. तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड, वैदयकीय अधिकारी डाॅ प्रवीण कानडे यांनी अख्खी यंत्रणा कामाला लावली. कर भरणा यादीपासून सर्व रेकाॅर्ड तपासले.परिसरातील समान आडनावाच्या सगळया कुटूंबियांची चौकशी करण्यात आली. मावळातील सर्व रुगणवाहीकांच्या चालकांजवळ चौकशी झाली. संबंधित व्यक्तीच्या नावासह सोशल मिडीयावर पोस्ट फिरत होत्या.त्याच आडनावाच्या तळेगाव स्टेशन परिसरातील सर्व रहीवाशांकडे विचारपुस करुनही सदर व्यक्तीला ओळखणारा कुणी भेटला नाही.
तळेगावचा पत्ता असणारा सदर कोरोना बाधित कुणा कुणाच्या संपर्कात आला असेल? या धास्तीने दिवसभर शोधमोहीम चालूच राहीली. नगरपरिषदेच्या पथकाने सदर रुग्णाच्या चाचणी अहवालावर पत्ता असलेला परिसर रात्री उशिरापर्यंत पिंजुन काढला मात्र काही थांगपत्ता लागलेला नाही.

चिंचवडच्या काकडे पार्कमध्ये कोरोना आला रे आला; काय आहे वास्तव वाचा सविस्तर

सदर व्यक्तीला अपघात झाल्यानंतर उपचारासाठी ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते.दरम्यान लक्षणे आढळल्यामुळे घेतलेली त्याची कोरीना चाचणी सोमवारी (ता.२५) पाॅझिटीव्ह आली. उपचारासाठी ससूनमध्ये दाखल होताना उत्तर सोलापुरचा पत्ता दिला आहे. या रुग्णावर सध्या ससूनमध्ये उपचार चालू आहेत.

पिंपरीतील आनंदनगर झोपडपट्टीसाठी माणुसकी आली धावून, बघा किती छान काम करताहेत 

तळेगाव नगरपरिषद हद्दीमध्ये संसर्गबाधित व्यक्तीचा अहवालातील पत्यानुसार शोध घेतला असता सदर व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही व कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे नगरपरिषदेस कन्टेनमेंट झोन घोषित करण्यास व त्याअनुषंगाने येणारी इतर कार्यवाही करणे शक्य नसल्याबाबत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनास कळवण्यात आले आहे.सदर व्यक्ती ही रस्त्यावर भटकणारी असून कुठल्याही चौकशीला प्रतिसाद देत नाही, असे ससून रुग्णालयाच्या प्रशासनाकडून कळाल्याचे मुख्याधिकारी दिपक झिंजाड यांनी सांगितले.

पिंपरीतील अटकेत असलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार 

मात्र, मंगळवारी दिवसभराच्या शोध मोहीमेनंतरही संबंधित व्यक्तीच्या तळेगाव रहीवासाबाबत अदयापही अनुमान न निघाल्यामुळे तळेगावकर आणि प्रशासनाच्या मनातील धाकधूक कायम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only Talegaon was terrified due to the misleading address of Corona