उद्योगनगरीत आता स्टार्टअपला संधी; पुणे विद्यापिठाने उचलले महत्त्वाचे पाऊल

Opportunity for startups now in the industrial city Pimpri Chinchwad
Opportunity for startups now in the industrial city Pimpri Chinchwad
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्टार्टअप इन्क्‍युबेशन सेंटर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्‍युबेशन ऍन्ड एंटरप्राईज यांच्यात मंगळवारी (ता. 15) सामंजस्य करार झाला. यामुळे शहरामध्ये जास्तीत जास्त स्टार्टअप सुरू होऊन अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. अधिकाधिक युवक-युवतींना लाभ होऊन त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळून स्वत:चे उद्योग सुरू करणे शक्‍य होणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिंचवड येथील ऑटोक्‍लस्टर येथे झालेल्या सामंजस्य कराराप्रसंगी पिंपरी-चिंचवड स्टार्टअप इन्क्‍युबेशन सेंटरच्या अधिकृत बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले. महापौर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, संचालक सचिन चिखले, आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमरकर, उपकुलगुरु उमराणी, रजिस्टार प्रफुल्ल पवार, एक्‍झिबिशन सेंटर प्रमुख अपूर्वा पालकर, सिनेट सदस्य संतोष ढोरे आदी उपस्थित होते. 

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड, ऑटो क्‍लस्टर व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने 14 नोव्हेंबर 2019 ला इन्क्‍युबेशन सेंटर कार्यान्वित झाले. ऑटो क्‍लस्टर रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिटयूटमार्फत प्रकल्पासाठी आवश्‍यक असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा पुरविण्यात येतात. तसेच मराठा चेंबर ऑफ कॉमर्स हे नवोदित उद्योजक यांना मार्गदर्शन करतात. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात दरवर्षी हजारो युवक व युवती पदवी मिळाल्यानंतर नोकरीच्या शोधात असतात अथवा स्वत:चा उद्योगधंदा सुरू करतात. स्वत:चा उद्योग सुरू करण्याच्या प्रयत्नामध्ये असलेल्या युवकांना अनेकदा अर्थिक व तांत्रिक अडचणी येतात. अशा वेळी स्टार्टअप इन्क्‍युबेशन सेंटर त्यांना मार्गदर्शक ठरते. तथापि, त्यांना त्यासाठी समुपदेशन, योग्य दिशा दाखविणे आवश्‍यक असते. यासाठी या पिंपरी चिंचवड स्टार्टअप इन्क्‍युबेशन सेंटर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्‍युबेशन ऍन्ड एंटरप्राईज यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये जास्तीत जास्त स्टार्टअप सुरू होऊन अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच युवकांना त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळून स्वत:चे उद्योग सुरु करणे शक्‍य होणार आहे. 

पिंपरीतील शगुन चौक परिसरातील वाहतुकीत बदल 

उदयोन्मुख उद्योजकांना नवी दिशा 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्‍युबेशन ऍन्ड एंटरप्राईज हे नवीन उदयोन्मुख उद्योजकांचा शोध घेणे, त्यांचेसाठी धोरणे आखणे, त्यांना समुपदेशन करणे, तांत्रिक सहाय्य करणे, आवश्‍यक प्रशिक्षण देणे, गुंतवणुकदांशी संपर्क साधण्यासाठी सहाय्य करणे, नवीन उदयोन्मुख उद्योजकांना प्रसिध्दी देणे आदी सहाय्य करणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com