पिंपरीतील शगुन चौक परिसरातील वाहतुकीत बदल 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 December 2020

पिंपरीतील आर्य समाज चौक ते डिलक्‍स चौक यादरम्यान ही नलिका टाकण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारपासून (ता.16) ते डिसेंबरपर्यंत शगुन चौकाकडून डिलक्‍स चौक, काळेवाडीकडे जाणारी लेन बंद करण्यात येणार आहे.

पिंपरी - जलनि:स्सारण नलिका टाकण्याच्या कामासाठी पिंपरीतील शगुन चौक परिसरातील वाहतुकीत बदल केले जाणार आहे. 

Coronavirus:पिंपरी-चिंचवड शहरात 107 नवीन रुग्ण 

पिंपरीतील आर्य समाज चौक ते डिलक्‍स चौक यादरम्यान ही नलिका टाकण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारपासून (ता.16) ते डिसेंबरपर्यंत शगुन चौकाकडून डिलक्‍स चौक, काळेवाडीकडे जाणारी लेन बंद करण्यात येणार आहे. यामुळे शगुन चौकातील वाहतूक साई चौक मार्गे जमतानी चौक ते काळेवाडी पूल या मार्गे सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोशीतील प्रिस्टीन ग्रीनच्या पार्कींगचा दीड वर्षांचा प्रश्न अखेर सुटला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic will be changed in Shagun Chowk area of Pimpri