इंद्रायणी नदीपात्रातील अतिक्रमण, अनधिकृत भराव हटविण्याचे आदेश  

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 December 2020

लोणावळ्यातील भुशी हद्दीतील सर्व्हे क्रमांक २४ मध्ये इंद्रायणी नदीपात्रात करण्यात आलेले अतिक्रमण, अनधिकृत भराव व बांधकाम हटविण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. याप्रकरणी तक्रारदार सुरेश पुजारी यांनी पत्रकार परिषदेत ही माहीती दिली.

लोणावळा - लोणावळ्यातील भुशी हद्दीतील सर्व्हे क्रमांक २४ मध्ये इंद्रायणी नदीपात्रात करण्यात आलेले अतिक्रमण, अनधिकृत भराव व बांधकाम हटविण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. याप्रकरणी तक्रारदार सुरेश पुजारी यांनी पत्रकार परिषदेत ही माहीती दिली. 

सर्व्हे क्रमांक २४ येथे इंद्रायणी नदीपात्रात व्यवसायिक प्रकाश मिश्रीमल पोरवाल यांनी नदीपात्रात राडा-रोडा, भराव टाकत अनधिकृत बांधकाम बांधकाम करण्यात आले आहे, अशी तक्रार माहीती अधिकार कार्यकर्ते सुरेश पुजारी व स्थानिक रहिवाशी आशिष शिंदे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे केली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंद्रायणी नदीत अतिक्रमण, राडा-रोडा, भराव टाकला आहे का?  पूररेषेच्या मर्यादेचे उल्लंघन झाले आहे का? याची पाहणी करण्यासाठी पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, महसुल विभाग, लोणावळा नगरपरिषद यांची समिती गठीत केली होती. याप्रकरणी प्रत्यक्ष पाहणी करत अहवाल सादर करण्याचे आदेश लवादाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र लवादाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत दिरंगाई केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने मावळचे तहसीलदार, पाटबंधारे विभाग, प्रदुषण नियंत्रण मंडळासह नगरपरिषदेस दणका देत एकत्रित पंधरा लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच याचप्रकरणी निर्धारीत वेळेत अहवाल सादर न केल्याने लवादाने लोणावळा नगरपरिषदेकडून पाच लाख रुपयांचा दंड वसूल केला होता.

भटक्‍या कुत्र्याला धडक देऊन ठार केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

राष्ट्रीय हरित लवादाने केलेला पंधरा लाख रुपयांचा दंड माफ करावा यासाठी करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळत चपराक दिली होती. गठीत समितीने दि. २४ डिसेंबर २०१९ रोजी सर्वे क्र. २४ येथे सिमांकन निश्चित करत अहवाल सादर केला होता. याआधारे प्रकाश पोरवाल यांनी नदी पात्रात अनधिकृत भराव, झुलता पुल तसेच सीमा भिंत उभारण्यात आल्याचा ठपका लवादाने ठेवला आहे. राष्टीय हरित लवादाच्या प्रिंसीपल बेंचचे मुख्य न्यायाधीश आदर्श कुमार गोयल, न्यायाधीश एस.के. सिंग, तज्ञ सदस्य डॉ. एस.एस. गॅब्रियल, डॉ. नगीन नंदा यांच्या खंडपिठाने सर्वे क्र. २४ मध्ये इंद्रायणी नदीपात्रात जवळपास २५७ चौ. मीटर क्षेत्रात करण्यात आलेला अनधिकृत भराव, उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पूर्वेकडे बांधण्यात आलेली संरक्षक सीमाभींत, बेकायदेशीर फाटक, हटविण्याचे आदेश लोणावळा नगरपरिषदेस दिले आहेत. व्यावसायिक प्रकाश पोरवाल हे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारी शरद जोशी विचारमंचच्या नावाचा दुरुपयोग करत यंत्रणांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत असा आऱोप सुरेश पुजारी यांनी यावेळी केला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order remove encroachment unauthorized filling Indrayani river basin