निगडीत लोखंडी रॉड, कोयत्याने टेम्पोची तोडफोड करीत माजवली दहशत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 January 2021

लोखंडी रॉड, कोयत्याने दोन टेम्पोची तोडफोड करीत परिसरात दहशत माजविली. तसेच दोन तरूणांकडील ऐवज लुटल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी तिघांना जेरबंद केले आहे. हा प्रकार निगडीतील अंकुश चौक येथे घडला. 

पिंपरी - लोखंडी रॉड, कोयत्याने दोन टेम्पोची तोडफोड करीत परिसरात दहशत माजविली. तसेच दोन तरूणांकडील ऐवज लुटल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी तिघांना जेरबंद केले आहे. हा प्रकार निगडीतील अंकुश चौक येथे घडला. 

मुस्ताक मजीद शेख (वय 32, रा. पांढरकर चाळ, दळवीनगर, आकुर्डी), इम्तियाज मुस्ताक शेख (वय 25, रा. ओटास्कीम, निगडी) या दोघांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. शनिवारी (ता.2) रात्री दहाच्या सुमारास रियाज कासीम हालयाळ (वय 28, रा. श्रमिक नगर, निगडी) हे त्यांचा मित्र सादिल आदिल मंसोरी यांच्यासोबत अंकुश चौक येथे अमीन शेख यांना चिकन मालाचे पैसे देण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपी तिथे गेले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इम्तियाज याने कोयता उगारून फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिन्ही आरोपींनी हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. अल्पवयीन आरोपीने फिर्यादी यांचा शर्ट फाडून खिशातून 6 हजार 430 रुपये आणि 10 हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला. तसेच जवळच पार्क केलेल्या एका आयशर टेम्पोच्या काचा फोडून परिसरात दहशत माजवली.

80 व्या वर्षी आजोबांची कमाल;टाकाऊ वस्तूंपासून बनवलं वॉटर सेव्हर 

तसेच नफिज सलीम शेख (वय 36, रा. अंकुश चौक, निगडी) यांच्याही टेम्पोच्या काचा फोडल्या. फिर्यादी यांनी त्यांचा टेम्पो अंकुश चौकात पार्क केला होता. आरोपींनी लोखंडी रॉड आणि कोयत्याच्या धाकाने दहशत निर्माण केली. त्यानंतर आरोपींनी टेम्पोच्या काचा फोडून डॅशबोर्डमधून तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून नेले. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

बदल्यांसाठी ऑनलाइन पोर्टल करणार;वर्षा गायकवाड यांचे आश्‍वासन

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panic broke tempo iron rod crime