आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालक संभ्रमावस्थेत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 February 2021

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्‍के प्रवेशासाठी शहरातील शाळांना नोंदणी करण्यासाठी 1७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्या मुदतीत १७४ शाळांनी नोंदणी केली. शिक्षण संचालनालयाच्या संभाव्य वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात होणे अपेक्षित होते.

पिंपरी - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्‍के प्रवेशासाठी शहरातील शाळांना नोंदणी करण्यासाठी 1७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्या मुदतीत १७४ शाळांनी नोंदणी केली. शिक्षण संचालनालयाच्या संभाव्य वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात होणे अपेक्षित होते.  मात्र ‘आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होत आहे. पालकांनी प्रवेशाकरिता आवश्यक कागद पत्रे तयार ठेवावीत,’ असा संदेश आरटीई संकेतस्थळावर झकळत आहे. त्यामुळे नोंदणीला मुदतवाढ मिळणार की प्रवेश मिळणार? याबाबत शिक्षण विभागाने स्पष्ट न केल्यामुळे पालक संभ्रमावस्थेत सापडले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांसाठी आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी आधी शाळा नोंदणीची व त्यातल्या प्रवेश क्षमतेच्या जागांची नोंदणी 31 जानेवारीपासून सुरू करण्यात आली होती. शाळा नोंदणीसाठी फारसा प्रतिसाद मिळालेला नव्हता.  म्हणून 31 जानेवारी ते 1७ फेब्रुवारीपर्यंत तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. आतापर्यंत शहरातील १७४ शाळांनी नोंदणी केली असून त्यात ३ हजार प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आलेल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत अद्यापही काही शळांची नोंदणी होणे बाकी आहे.

विरोधकांच्या आंदोलनाची हवा काढून टाकण्यासाठी भाजपने खेळला मास्टर स्ट्रोक

शाळांचे 100 टक्‍के रजिस्ट्रेशन पूर्ण न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महापालिका प्रशासन अधिकारी यांची राहणार आहे, असे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप यांनी स्पष्ट केले आहे. 

आरटीई शाळा नोंदणी बंद
गेल्या काही दिवसांपासून शाळांची आरटीई नोंदणी सुरू आहे. अशी माहिती  शिक्षण संचालनालयाकडून दिली जात आहे. पण खरी परिस्थिती वेगळीच असून अद्यापही आरटीई नोंदणी ऑनलाइन पद्धतीने सुरू नसल्याचे दिसून येत आहे. यासाठीच भोसरीतील पालक विकास भूंबे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेल करून याकडे लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.

देहू-कॅटोन्मेंट शाळेत गर्दी; विद्यार्थी-पालकांमध्ये गोंधळ

उन्नत केंद्र  -शाळा नोंदणी-प्रवेशासाठी जागा
- आकुर्डी - १०८ - २ हजार
- पिंपरी - ६७ - १ हजार 675

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents confused about RTE online admission process