BJP and shivsena
पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १४, १५ आणि १६ या तीन प्रभागांमधील जागावाटपावरून भाजप-शिवसेना युती ताणली जात होती, मात्र शिवसेनेला १३ ते १५ आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) ३ ते ५ जागा सोडण्याच्या निर्णयावर युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. शनिवारी (ता. २७) रात्री उशिरा या तीन पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.