Wakad Crime : पेंटरच्या खूनप्रकरणी आणखी दोघांवर गुन्हा; एकूण आरोपी नऊ, सात अटकेत

पेंटिंगचे काम करत नसल्याच्या रागातून पेंटरला पाईपने मारहाण करत त्याचा खून केल्याची घटना गेल्या महिन्यात शुक्रवारी (ता. २६) मुकाई चौक, रावेत येथे घडली होती.
Crime
Crimesakal

वाकड - पेंटिंगचे काम करत नसल्याच्या रागातून पेंटरला पाईपने मारहाण करत त्याचा खून केल्याची घटना गेल्या महिन्यात शुक्रवारी (ता. २६) मुकाई चौक, रावेत येथे घडली होती. या गुन्ह्यात एका दाम्पत्याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. वाकड पोलिसांनी त्या दोघांवर गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणातील आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे.

भुवाल उर्फ मनोज जगदीश मौर्या याचा खून झाला होता. तर स्मिता तुषार हांडे, तुषार मारुती हांडे (रा. लोढा स्कीम, गहुंजे) या दाम्पत्यावर नव्याने गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांच्या सांगण्यावरूनच आरोपींनी मनोजला मारहाण उचलून नेत मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादी पत्नीने जबाबात म्हटले आहे. याप्रकरणातील सात आरोपींना यापूर्वीच वाकड पोलिसांनी १२ तासांत अटक केली होती.

मयत मनोजने शुभमकडून पेंटिंगच्या कामासाठी पैसे घेतले होते. मात्र तो पैसेही माघारी देत नव्हता आणि कामही करत नव्हता. त्यामुळे शुभमने मनोजला चारचाकीतून वाल्हेकर वाडीत नेले. तेथे मनोजचे हातपाय काथ्याने व रिबीनने बांधले. तू माझे पैसे दे नाहीतर तुला मारणार, असे शुभम म्हणाला.

त्यावर माझ्याकडे पैसे नाहीत, असे मनोज यांनी सांगितले. त्यामुळे आरोपींनी पीव्हीसी पाइपने मनोज यांना बेदम मारहाण केली. मनोज बेशुध्द झाल्याने दिनेश मस्के व अक्षय पाटील यांनी मनोजला रिक्षातून थेरगाव रुग्णालयात सोडून पळून गेले होते.

प्रतिक्रिया

हे खून प्रकरण गुंतागुंतीचे होते. कुठलेही धागेदोरे नसताना बारा तासांच्या आत आम्ही आरोपीपर्यंत पोहचलो. सात जणांना अटक केली. तपासात अन्य दोघांचा सहभाग असल्याचे दिसत आहे. त्यात कितपत तथ्य आहे त्या दृष्टीने देखील आमचा तपास सुरू आहे.

- गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com