esakal | पिंपरी : अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना केले कार्यमुक्त 
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar

महापालिकेत रुजू झाल्यापासून विविध कारणांनी चर्चेत राहिलेल्या अतिरिक्त आयुक्त दोनचे अजित पवार यांना बुधवारी (ता. ७) तडकाफडकी सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले.

पिंपरी : अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना केले कार्यमुक्त 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेत रुजू झाल्यापासून विविध कारणांनी चर्चेत राहिलेल्या अतिरिक्त आयुक्त दोनचे अजित पवार यांना बुधवारी (ता. ७) तडकाफडकी सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले. आयुक्त राजेश पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोविड केअर सेंटरला दिलेल्या जादा बिलांमुळे पवार अडचणीत आले होते. त्यांचे सर्व आर्थिक अधिकारही काढून घेण्यात आले होते.

राज्याच्या महसुल विभागातील अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अजित पवार यांची मूळ नियुक्ती पुण्यातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी झाली होती, पण त्याचदिवशी ५ सप्टेंबर २०१९ रोजी ते महापालिकेत रुजू झाले होते. या पदावर नियुक्ती झाल्यावर त्यांना अतिरिक्त आयुक्त या पदावरून तत्काळ कार्य मुक्त करण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र, शासनाला पाठविलेल्या एका पत्राचा आधार घेऊन ते दीड वर्ष महापालिकेत कार्यरत राहिले. १९ महिन्यांच्या कालावधीत त्यांनी विविध निर्णय घेतले. कोरोना महामारीत फिल्डवर्क करत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. परंतु, कोविड केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण नसताना कोटी रुपयांची बिले अदा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. तसेच, त्यांच्या कार्यशैलीवर आणि नेमणुकीवर विविध आक्षेप घेण्यात आले. 

पिंपरी चिंचवडमधील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

स्पर्श हॉस्पिटलमधील भ्रष्टाचार आणि ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी घेतलेला आक्षेप या कार्यमुक्तीला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. कारण पवार यांनी स्पर्श हॉस्पिटलला कोविडचे सरसकट बिल मंजूर करून अदा केल्याचे अंगलट आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे त्या सेंटरमध्ये एकही रुग्ण नव्हता, तरी तीन कोटी १४ लाख रुपये अदा केले. यावरून बरेच राजकारण पेटले होते. या पार्श्वभूमीवर आयुक्त राजेश पाटील यांनी पवार यांना महापालिका सेवेतून आज तडकाफडकी कार्यमुक्त केले. 

हे वाचा - ‘कोरोना बॉडी स्कॉड’च्या कर्मचाऱ्यांची हेळसांड; नातेवाइकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन

दरम्यान, आज महापालिका आयुक्त पाटील यांनी आजच्या कामाची वेळ संपल्यानंतर महापालिका कामकाजातून पवार यांना मुक्त करण्यात येत असल्याचे आदेश बजावले. शासनाने नियमित अथवा अतिरिक्त पदभाराबाबत कोणतेच आदेश न दिल्यामुळे आपण कार्यमुक्त करत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

loading image