पिंपरी-चिंचवडमध्ये 20 कोटींचे ड्रग्ज जप्त; चाकण परिसरात मोठी कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

सध्या ड्रग्ज प्रकरणावरुन देशभरात चर्चा सुरु असतानाच चाकण परिसरात २० कोटींचे ड्रग्ज जप्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पिंपरी : सध्या ड्रग्ज प्रकरणावरुन देशभरात चर्चा सुरु असतानाच चाकण परिसरात २० कोटींचे ड्रग्ज जप्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण परिसरात २० कोटी रुपयांचे मेफड्रॉन ड्रग्ज जप्त केल्याची मोठी कारवाई केली. बुधवारी दुपारी ही कारवाई केली असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाला सेल पिंपळगाव येथे ड्रग्ज विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांना २० कोटी रुपयांच्या मेफड्रॉन ड्रग्ज जप्त करुन ५ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ५ लाखांची कार आणि रोख २३ हजार १०० असा एकुण २० कोटी ५लाख २३ हजार १०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याप्रकरणी आरोपी चेतन फक्कड दंडवते (वय : २८, रा.शिरूर,जि. पुणे) आनंदगीर मधूगिर गोसावी (वय२५,रा,रुईखेडा,जि.जळगाव, रा. शिरूर) अक्षय शिवाजी काळे (वय : २५ रा. शिरूर) संजीवकुमार बन्सी राऊत(वय-४४, रा.नोएडा, उत्तरप्रदेश) तौसिफ हसन मोहम्मद तस्लिम (वय- ३१, रा.नोएडा, उत्तरप्रदेश) या पाच जणांना निळ्या रंगाची पोलो कार क्र(मांक्र. एम.एच-१२ -एम.एल-४५१६) सहित ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलिसांत तक्रार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक फौजदार शागिर जिनेडी यांनी दिली आहे.

आता गुन्हेगारांचं काही खरं नाही; पोलिस आयुक्तांनी केलाय मोठा निर्धार!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpari chinchawad police seized drugs worth 20 cr in chakan area