World Cup 2023: फॅन्टसी क्रिकेटमध्ये दीड कोटी जिंकणारे पिंपरीचे PSI अडचणीत...काय आहे कारण?

पिंपरी चिंचवडमधील PSIचं नशीब उजळलं! फॅन्टसी क्रिकेटमध्ये जिंकले तब्बल दीड कोटी रुपये
World Cup 2023
World Cup 2023Esakal

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम ११ ऑनलाइन गेममध्ये तब्बल दीड कोटींचे बक्षीस जिंकलं आहे. दरम्यान आता पिंपरी पोलीस दलातील पीएसआय सोमनाथ झेंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी तपासून पीएसआय सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल, झेंडे यांची चौकशी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान करोडपती झाल्यावर अनेकांनी झेंडे यांचे अभिनंदन केलं, तर काहींनी यावर आक्षेप देखील घेतला. त्यामुळे सोमनाथ झेंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ऑनलाइन जुगार खेळणारे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करणारे पत्र भाजपाचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलं आहे. त्यांच्या या पत्राची काही तासातच पिंपरी- चिंचवड पोलिसांनी देखील दखल घेतली आहे.

World Cup 2023
World Cup 2023: पिंपरी चिंचवडमधील PSIचं नशीब उजळलं! फॅन्टसी क्रिकेटमध्ये जिंकले तब्बल दीड कोटी रुपये

कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी तपासून पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. झेंडे यांची चौकशी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असणाऱ्या सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम इलेव्हन वरती दीड कोटी रुपये जिंकले. मागच्या तीन महिन्यांपासून झेंडे ड्रीम इलेव्हनवर टीम बनवत होते. बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यासाठी झेंडे यांनी ड्रीम इलेव्हनवर टीम लावली होती.

World Cup 2023
Mla Disqualification Case: शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर आज होणार सुनावणी, सुनावणीनंतर राहुल नार्वेकर करणार दिल्लीवारी

ड्रीम इलेव्हनवर दीड कोटी जिंकल्यानंतर झेंडे करोडपती झाले, त्यामुळे त्यांचं कुटुंबही खूश झालं. तरीही ऑनलाईन गेमिंग धोकादायक असल्याचं झेंडेंनी सांगितलं आहे. अशा गेम्सपासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे, कारण याचं व्यसन लागून आर्थिक नुकसानही होऊ शकतं, असं आवाहन देखील सोमनाथ झेंडे यांनी केलं आहे.

World Cup 2023
Mla Disqualification Case: शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर आज होणार सुनावणी, सुनावणीनंतर राहुल नार्वेकर करणार दिल्लीवारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com