

Kalewadi and Pimple Saudagar Spa's Shut Down
Sakal
पिंपरी : पिंपळे सौदागर येथील व्हीजन गॅलरी मॉलमधील न्यू ओम स्पा व कस्पटे वस्ती, वाकड काळेवाडी फाटा, कस्पटे वस्ती येथील रिपेन स्पा येथे सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्याने येथे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने छापा टाकला. या प्रकरणी अनुक्रमे सांगवी व वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.