

सांगलीतून बाळाला उचललं अन् चिपळूणमध्ये एक लाख ८० हजारांना सौदा
esakal
Baby Kidnapped from Sangli : विश्रामबाग चौकातून पळवलेल्या एक वर्षाच्या मुलाचा सावर्डे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे एक लाख ८० हजार रुपयांना सौदा करण्यात आला होता. पोलिसांनी हा डाव उधळून लावत, त्या बाळाला आईच्या कुशीत सुखरूपपणे सुपूर्द केले. ऐन दिवाळीत झालेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तीन दिवस शोधमोहीम राबविली. विश्रामबाग आणि एलसीबीच्या संयुक्त पथकाला अखेर यश आले. पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत ते बाळ आईकडे देण्यात आले. फुगे विकणाऱ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. स्वतः अधीक्षक संदीप घुगे यांनी त्या बाळाला मिठाई भरवल्याने सारेच गहिवरले.