पिंपरी : अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ दोन महिन्यांनी पालिकेत रुजू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी जितेंद्र वाघ यांची नियुक्ती

पिंपरी : अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ दोन महिन्यांनी पालिकेत रुजू

पिंपरी ः महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून जितेंद्र वाघ यांची दोन महिन्यांपूर्वी प्रतिनियुक्तीने निवड झाली होती. मात्र, त्यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. वादग्रस्त अजित पवार यांच्या जागेवर ते रूजू झाले आहेत.

महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्त पदे आहेत. राज्य सेवेतील दोन आणि स्थानिक अधिकाऱ्यांमधून एक अशी विभागणी आहे. संतोष पाटील यांच्या जागेवर विकास ढाकणे यांची नियुक्ती झाली. त्यानंतर प्रवीण तुपे यांनी राजीनामा दिल्याने स्थानिक अधिकाऱ्यांमधील उल्हास जगताप यांची नियुक्ती करण्यात आली. अ

हेही वाचा: राष्ट्रपतींच्या हस्ते शिखरचा सन्मान

अतिरिक्त आयुक्तपदी वाघ यांची प्रतिनियुक्तीने नेमणूक केल्याची ऑर्डर १७ सप्टेंबरला निघाली होती. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी महापालिकेत ते रुजू झाले. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडील विभाग कमी होतील. आयुक्त राजेश पाटील कोणते विभाग कोणाकडे देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

loading image
go to top