राष्ट्रपतींच्या हस्ते शिखरचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shikhar Dhawan

राष्ट्रपतींच्या हस्ते शिखरचा सन्मान

sakal_logo
By
सुधीर काकडे

दिल्ली: राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते क्रीडा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी प्रसिद्ध क्रिकेटपटू शिखर धवनचा गौरव करण्यात आला. भारताचा अनुभवी फलंदाज शिखर धवनला (Shikhar Dhawan) अर्जुन पुरस्कार (Arjuna Award) प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद आज क्रीडा विश्वात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ६२ खेळाडूंचा सन्मान करत आहेत. यामध्ये काही महिला खेळाडूंचा देखील समावेश आहे. या कार्यक्रमाला क्रीडा मंत्री अनुराग ठाकूरही उपस्थित होते.

हेही वाचा: Video : गोल्डन बॉय नीरजसह या खेळाडूंचा खेलरत्न पुरस्कारने सन्मान

राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात शिखर धवनसह, अनेक भारतीय खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यामध्ये भारतीय हॉकी संघाच्या पी.आर. श्रीजेश आणि मनप्रीत सिंग यांचाही समावेश आहे.

हेही वाचा: भारत-पाकमधील गोडव्यासाठी ICC धडपडणार नाही, कारण...

दरम्यान, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांच्यासह १२ खेळाडूंना राष्ट्रपतींच्या हस्ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिला क्रिकेटपटू मिताली राज हिलाही यावर्षी खेलरत्न देण्यात आला.

loading image
go to top