पिंपरी : आरोग्य गैरव्यवस्थेचा आणखी एक बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी : आरोग्य गैरव्यवस्थेचा आणखी एक बळी

पिंपरी : आरोग्य गैरव्यवस्थेचा आणखी एक बळी

पिंपरी (कामशेत) : ‘तीस किलोमीटर अंतरावर तिला रक्ताची पहिली उलटी झाली. चाळीस किलोमीटरवर दुसरी उलटी झाली. त्यात तिची प्राणज्योत मालवली. उपचारांसाठी खासगी वाहनातून आणलेल्या सतरा वर्षीय लाडक्या लेकीचा उपचारापूर्वी रस्त्यातच झालेल्या मृत्यूने आई-वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला. लाडकी लेक रस्त्यातच गतप्राण झाल्याने आई-बापाने फोडलेला हंबरडा फोडला. आंदर मावळात आरोग्याबाबत असलेल्या अव्यवस्थेचा आणखी एक बळी गेला.

निळशीतील सिद्धी शशिकांत तनपुरे असे या सतरा वर्षीय तरुणीचे नाव. तिचा दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. सिद्धी तापाने फणफणली होती. तिच्यावर खासगी रुग्णालयात औषध उपचार करून घरी सोडण्यात आले होते. पुन्हा तिची प्रकृती खालावली म्हणून तिला तातडीने उपचारासाठी शहरांमध्ये दाखल करायला आई-वडील घेऊन निघाले.

निळशी ते वडेश्वर हे चाळीस किलोमीटरचा अंतर कापून आल्यावर सिद्दीला पहिली रक्ताची उलटी झाली आली. तिच्या रक्ताच्या उलटीने आई-वडील पूर्ण गांगरून गेले. वडेश्वर येथे अद्ययावत सुविधा असलेला कोणताच रुग्णालय असल्याने त्यांनी तिला पुढे आणली. टाकवे बुद्रुक येथेही सर्व सुविधायुक्त रुग्णालय नसल्याने त्यांनी तिला तळेगाव परिसरात दवाखान्यात आणण्यासाठी धावपळ केली. टाकवे बुद्रुक सोडून काही अंतर पुढे आल्यावर सिद्धीला पुन्हा रक्ताची दुसरी उलटी झाली. त्यातच तिची प्राणज्योत मालवली. तिच्या जाण्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. सिद्धीसारख्या एक ना अनेक जणांचे वेळेवर उपचार न झाल्याने मृत्यू झाल्याच्या घटना ग्रामीण भागात वेळोवेळी घटल्या आहेत. एसटी बसचा अपघात असो, सर्पदंश असो, हृदयविकाराचा झटका असो, अशा प्रसंगात सर्व सुविधायुक्त रुग्णालय ग्रामीण भागात नसल्याने मोठी गैरसोय होते. दवाखान्यांच्या अंतर आणि अपघात झालेल्या अथवा उपचार घेण्यासाठी झाल्याचे अंतर यात खूप वेळ जात असल्याने अशा प्रसंगांना ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक वेळा सामोरे जावे लागले आहे. जिल्हा ग्रामीण रुग्णालय कान्हे फाटा येथे लवकरच कार्यान्वित होणार असल्याचा एक आधार ग्रामीण जनतेच्या समोर आहे. आंदर मावळातील सत्तर गावांना सोयीचा ठरेल, असा मध्यवर्ती ठिकाणी सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने अथवा सर्व सुविधायुक्त रुग्णालयाची नितांत गरज असल्याच्या भावना नागरिक करीत आहे.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

"माझ्या मुलाचा एसटीच्या धडकेत अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी घेऊन जाताना कोंडिवडेच्या जवळ तो गतप्राण झाला. ग्रामीण भागात पुरेशी आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे."

- अंतू आलम, माळेगाव बुद्रुक

"ग्रामीण आरोग्य केंद्राची मागणी करावी. नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेचा वापर करावा. नजीकचा दवाखाना गाठावा."

- चंद्रकांत लोहारे, तालुका आरोग्याधिकारी

loading image
go to top