पिंपरी : भाच्याचा मामावर प्राणघातक हल्ला

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
Crime
Crimesakal

पिंपरी : भाच्यासह चौघांनी मिळून मामावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना पिंपरीतील गांधीनगर येथे घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

देवेंद्र लक्ष्मण कांबळे (वय ४२, रा. गांधीनगर, पिंपरी) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या मामाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाचा संतोष नागोजे याच्यासह सोन्या नागोजे (दोघेही रा. तुर्भे नाका, मुंबई), गोपाळ व मिथुन चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Crime
भाजप कार्यकारिणीची बैठक संपली; मोदींनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

पोलिस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ यांनी दिलेली माहिती अशी, देवेंद्र हे शनिवारी (ता. ६) भाऊबीजेनिमित्त बहिणेकडे मुंबईला गेले होते. तेथे त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर ते रात्री घरी आले. दरम्यान, या भांडणावरून रविवारी (ता.७) सायंकाळी पाचच्या सुमारास देवेंद्र यांच्या भाच्यासह त्याचे साथीदार देवेंद्र यांच्या पिंपरीतील घरी आले. त्यांना सिमेंटचा ब्लॉक व कोयत्याने मारहाण केली. या प्राणघातक हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. या हल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com