
मध्यवर्ती भागी कवी बहिणाबाईचा पुतळा व त्यांचे कार्य याची माहिती दिली जाणार आहे.
पिंपरी : चिंचवड-संभाजीनगर(chinchwad - sambhajinagar) येथील ‘निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालया’ने(bahinabai choudhari zoo) कात टाकली आहे. येत्या मार्चमध्ये नव्या रूपात पर्यटकांसाठी खुले होणार आहे. प्राणी आणि पक्ष्यांना अनुकूल नैसर्गिक वातावरण निर्मिती केली आकर्षक पद्धतीने भव्य रूपात केली आहे. त्यामुळे, हे प्राणिसंग्रहालय आकर्षण ठरणारे आहे. सरपटणारे प्राणी, पाणथळ पक्षी, जमिनीवरील आणि जंगलातील प्राण्यांचा अधिवास, तसेच गोलघुमट असे विविध पाच विभाग लक्षवेधक आहेत. काम पाच टक्के राहिले आहे.
नूतनीकरणासाठी २६ डिसेंबर २०१६पासून आहे. नवी दिल्लीतील केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने प्राणी संग्रहालयास १९ ऑगस्ट २०२२ पर्यंत मान्यता दिली आहे. या कामासाठी आतापर्यंत १४ कोटी खर्च झाला आहे. सुरुवातीला ५ कोटी ८५ लाख खर्च झाला आहे. सात एकरामध्ये सर्पोद्यान आणि पक्ष्यालय या संकल्पनेवर आधारित हे देशातील उत्तम प्रतीचे प्राणी संग्रहालय असेल, असा दावा महापालिकेचा आहे. प्राण्यांची माहिती देणे, जनजागृती करणे, प्राण्यांमध्ये नागरिकांबाबत आत्मीयता निर्माण करणे असा हेतू आहे.आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील बदलांचा अभ्यास करून शहरात साकार होत असलेल्या या संग्रहालयामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे.
गुजरातमधील सुंदरबनच्या मॉडेलचा यामध्ये काहीअंशी समावेश आहे. फुलपाखरांसाठी देखील पिंजरा उभे करण्यात येणार आहे. तसेच, मध्यवर्ती भागी कवी बहिणाबाईचा पुतळा व त्यांचे कार्य याची माहिती दिली जाणार आहे.
मनुष्यबळाची कमतरता
प्राणीसंग्रहालय उभे केले. परंतु, २ ॲनिमल किपर, १ डॉक्टर व १ क्युरेटर उपलब्ध आहे. केवळ चतुर्थ श्रेणीतील काही पदांची गरज आहे. त्याचप्रमाणे अस्थायी स्वरूपाच्या मनुष्यबळावर सध्या कारभार सुरु आहे. यासाठी अनुभवी व तज्ज्ञ मनुष्यबळ आवश्यक आहे. लवकरच ते उपलब्ध होणार असल्याचे सहायक आयुक्त यांनी सांगितले.
हे राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण असे प्राणिसंग्रहालय होईल. हे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पशुवैद्यक, सर्वेक्षक उपलब्ध झाले आहेत. पाच टक्के स्थापत्यची कामे बाकी आहेत. मार्च २०२२ पर्यंत प्राणिसंग्रहालय सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
- नीलेश देशमुख,
सहायक आयुक्त,
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
काय आहे विशेष
प्रत्येक प्राण्यांच्या आवश्यकतेनुसार ठरावीक आकारमानाचे पिंजरे
प्राण्यांना आवश्यक सेवा-सुविधा देण्यासाठी प्राधान्य
प्राण्यांसाठी अद्ययावत रुग्णालय (आठशे ते नऊशे चौरस मीटर)
प्राणिसंग्रहालयाच्या मध्यभागी माहिती केंद्र
वन्यजीवविषयक ग्रंथालय
लहान मुलांना वन्यजीव संकल्पना समजावी, अशा खेळांचे नियोजन
सदाहरित वनाच्या संकल्पनेवर आधारित लॅन्डस्केपिंग
वन्यजीव शैक्षणिक केंद्राची सुविधा; दोन ऍम्फी थिएटर
गोलघुमट, गुहेप्रमाणे व ढगांसारखे, जंगलातील झाडांप्रमाणे रचना
सेल्फि पॉइंट
तिकीट वाढीची शक्यता
लहान मुलांसाठी १० रुपये
मोठ्यांसाठी : २५ ते ३० रुपये
दिव्यांगाना मोफत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.