esakal | Pimpri : भारूड कलाकारांना राजाश्रय द्यावा
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri

Pimpri : भारूड कलाकारांना राजाश्रय द्यावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ: पिढ्यान् पिढ्या भारुडाची कला जोपासणाऱ्या कलाकारांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. कोरोनामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे सरकारने ही कला व कलाकारांना राजाश्रय द्यावा, अशी मागणी अखिल पुणे जिल्हा नाट्यरूपी भजनी भारूड कलाकार संघाने केली आहे.

भजनी भारूड कलाकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नवलाख उंबरे येथील श्रीराम मंदिरात झाली. संदीप कोळेकर, तुकाराम गाडे, गोपाळ पवळे, नवनाथ पडवळ, खंडेराव घारे, नामदेव साठे, सुरेंद्र भगत, किसन खुटवड, ज्ञानोबा कुडले, सुखदेव डफळ, कैलास राजगुरू, तुकाराम भालचीम, सखाराम भागीत आदींसह मावळ, खेड, हवेली, आंबेगाव, भोर, मुळशी आदी तालुक्यातील भारूड कलाकार उपस्थित होते.

संघाचे सचिव परशुराम वाघचौरे यांनी प्रास्ताविकात सांगितले, ‘‘ग्रामीण भागातील जत्रा-उरुसांमध्ये भारुडाचे कार्यक्रम मोठ्या हौसेने सादर केले जातात. पुणे जिल्ह्यात ६०हून अधिक भारूड मंडळे आजही कार्यरत आहेत.

भारूड कलाकार हा मध्यम वर्गीय व डोंगर-दऱ्यात राहणारा कलाकार आहे. कोरोनाकाळात या कलाकारांचे खूप हाल झाले.’’ पवळे म्हणाले, ‘‘गेल्या दोन वर्षांपासून कार्यक्रम बंद असल्याने कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने त्वरित मदत द्यावी. शिवाय, या मागणीसाठी विविध मार्गांनी पाठपुरावा करण्यात येईल.’’ हनुमंत कोंढाळकर यांनी आभार मानले.

loading image
go to top