पिंपरी : कर्नाटक काँग्रेसच्या नेत्याविरोधात भाजपाचे आंदोलन

कर्नाटक काँग्रेस प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीवली यांनी आक्षेपार्ह विधान केले होते.
Protest by BJP in Pimpri Chinchwad
Protest by BJP in Pimpri ChinchwadSakal
Summary

कर्नाटक काँग्रेस प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीवली यांनी आक्षेपार्ह विधान केले होते.

पिंपरी - हिंदूधर्म आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणारे कर्नाटक काँग्रेसचे नेते सतीन जारकीवली याच्याविरोधात पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्यावतीने शनिवारी (ता. १२) निदर्शने करण्यात आली.

कर्नाटक काँग्रेस प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीवली यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. तसेच, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या ‘धर्मवीर’ उपाधीचा व मराठ्यांचा अपमान करत मुक्ताफळे उधळली आहेत., असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला.

दरम्यान, भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली मोरवाडी येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. काँग्रसेचा नेता जारकीवली याच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस अमोल थोरात, जिल्हा सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, राजेश पिल्ले, विलास मडेगिरी, संकेत चोंधे, गणेश यादव, प्रकाश जवळकर आदी उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, हिंदू धर्माबाबत आम्हाला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीद्वारे अशा बेजबाबदार आणि अवमानकारक व्यक्तव्याचा निषेध होत आहे. काँग्रेसच्या ‘त्या’ नेत्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com