esakal | पिंपरी : भाजपमधील निष्ठावंतांनी महापालिकेत केला 70 पिढ्यांचा उध्दार
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी : भाजपमधील निष्ठावंतांनी महापालिकेत केला 70 पिढ्यांचा उध्दार

महापालिकेत सत्ताधारी भाजप अंतर्गत कलह किती शिगेला पोहचला आहे याची चुणुक आज (बुधवार) पहायला मिळाली. सत्तारुढ पक्षनेत्यांच्या दालनात निष्ठावंतांमध्ये चांगलीच जुंपली. एकमेकांनी त्यांच्या सत्तर पिढ्यांचा उद्धार केला. या वादावादीमुळे इतरांचे मनोरंजन झाले; मात्र, अशा पदाधिकारी आणि नगरसेवकांमुळे पक्षाची प्रतिमा डागाळत चालल्याची चर्चा रंगली.

पिंपरी : भाजपमधील निष्ठावंतांनी महापालिकेत केला 70 पिढ्यांचा उध्दार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेत सत्ताधारी भाजप अंतर्गत कलह किती शिगेला पोहचला आहे याची चुणुक आज (बुधवार) पहायला मिळाली. सत्तारुढ पक्षनेत्यांच्या दालनात निष्ठावंतांमध्ये चांगलीच जुंपली. एकमेकांनी त्यांच्या सत्तर पिढ्यांचा उद्धार केला. या वादावादीमुळे इतरांचे मनोरंजन झाले; मात्र, अशा पदाधिकारी आणि नगरसेवकांमुळे पक्षाची प्रतिमा डागाळत चालल्याची चर्चा रंगली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

2017 मध्ये मोदी लाटेमुळे भारतीय जनता पक्षाने महापालिकेची सत्ता एकहाती मिळविली. मात्र, काहीच दिवसांत अंतर्गत उणीदुणीतून पक्ष विविध गटातटांमध्ये विभागला. भोसरी, चिंचवड आणि निष्ठावंत असे तीन गट सध्या शहरात कार्यरत आहेत. आजअखेर भोसरी आणि चिंचवड या दोन गटात उघडपणे वाद झाले आहेत. परंतू, मंगळवारी निष्ठावंतांमध्येच कलगीतुरा रंगला. सुरुवातीच्या शाब्दिक बाचाबाचीनंतर एकमेकांच्या सत्तर पिढ्यांचा उद्धार करण्यापर्यंत वाद पोहोचला. स्थायी समितीच्या एका माजी पदाधिकाऱ्याने सर्वांची समजूत काढून वाद संपविला. मात्र पक्षाचा एक पदाधिकारी आणि एका स्विकृत नगरसेवकाने पक्षनेत्याचा दरवाजा जोराने आपटून आपला राग व्यक्त केला.

कोरोनामुक्तांसाठी दिलासादायक बातमी; आता पिंपरीमध्ये सुरू होणार कोविड पश्‍चात उपचार केंद्र

पक्षनेते नामदेव ढाके यांनी मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. तर भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने मात्र पक्षनेत्यांसोबत किरकोळ बाचाबाची झाल्याच्या प्रकाराला दुजोरा दिला.

Edited By - Prashant Patil