पिंपरी : प्रसिद्धीसाठी आमदार बंधूंच्या कार्यालयावर टाकल्या रॉकेलच्या बाटल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

पिंपरी : प्रसिद्धीसाठी आमदार बंधूंच्या कार्यालयावर टाकल्या रॉकेलच्या बाटल्या

पिंपरी : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू व उद्योजक शंकर जगताप यांच्या कार्यालयावर रॉकेल भरलेल्या बाटल्या टाकणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाव कमविण्यासाठी आरोपींनी हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात पुढे येत आहे.

या घटनेप्रकरणी राहुल राम साळुंके (राहणार पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिलेली आहे. शंकर जगताप यांचे पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक येथे चंद्ररंग डेव्हलपर्स अ‍ॅण्ड बिल्डर्स नावाचे कार्यालय आहे. मंगळवारी (ता.२३) दुपारी पावणे तीनच्या सुमारास ते कार्यालयात बसले होते. त्यावेळी एका दुचाकीवरून तिघेजण आले. त्यांनी आपल्याजवळील रॉकेल भरलेल्या दोन पेटत्या बाटल्या जगताप यांच्या कार्यालयाच्या दिशेने फेकून ते दुचाकीवरून पसार झाले. एक बाटली सीमाभिंतीवर पडून तिचा स्फोट झाला. तर दुसरी बाटली शेजारील एका शटरवर पडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला.

हेही वाचा: एसटी संप मिटणार? सायंकाळी सहा वाजता अनिल परब करणार मोठी घोषणा

दरम्यान, पोलिसांनी दोघांना शहरातून तर एकाला शहराबाहेरून ताब्यात घेतले. या आरोपींकडे तपास केला असता त्यांनी नाव कमावण्यासाठी हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे . मात्र , यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, ही घटना कोणाच्या सांगण्यावरून केली याचाही पोलिस शोध घेत आहेत.

loading image
go to top