पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी 24 गुन्हेगारांना केले तडीपार 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या परिमंडळ एकच्या हद्दीतील 24 सराईत गुन्हेगारांना एकाच दिवशी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. आयुक्तालय स्थापन झाल्यापासून प्रथमच तडीपारीची अशी मोठी कारवाई करण्यात आली.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या परिमंडळ एकच्या हद्दीतील 24 सराईत गुन्हेगारांना एकाच दिवशी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. आयुक्तालय स्थापन झाल्यापासून प्रथमच तडीपारीची अशी मोठी कारवाई करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वारंवार होत असलेल्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालून शहर गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्वानंद उर्फ चिक्‍या नागेश खरात (वय 22, रा. थरमॅक्‍स चौक, चिंचवड), संग्राम उर्फ आवळ्या गुरूनाथ भोसले (वय 27), धनंजय उर्फ बबल्या सूर्यकांत रणदिवे (वय 20, रा. दळवीनगर, ओटास्कीम), विकी उर्फ विकास शिवाजी लष्करे (वय 23, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी), निखील साहेबराव साठे (वय 26, रा. दळवीनगर, निगडी), आदर्श उर्फ छोट्या अशोक मगर (वय 21), अख्तर उर्फ मुन्ना जमालुद्दीन शेख (वय 20), आकाश उर्फ डड्या बसवराज दोडमनी (वय 23), अजय रणजित शेंडगे (वय 19), संघर्ष उर्फ शंक्‍या विष्णू भालेराव (वय 20, सर्व रा. ओटास्कीम, निगडी) पिंपरी ठाण्याच्या हद्दीतील अतुल उर्फ चांड्या अविनाश पवार (वय 28, रा. मिलिंदनगर , पिंपरी), दिनेश विलास शिंगाडे (वय 25, रा. खराळवाडी, पिंपरी) भोसरी एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीतील पवन बंडू शिरसाठ (वय 22, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी), सचिन डॅनियल खलसे (वय 25, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी), रवी दिलीप गाडेकर (वय 25, रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी), पवित्रसिंग जोहरसिंग भोंड (वय 30, रा. खंडेवस्ती झोपडपट्टी, भोसरी), इस्तीयाक इनामुल खान (वय 25, रा. संजय गांधीनगर, मोशी) भोसरी ठाण्याच्या हद्दीतील विजय मनबहादूर थापा (वय 22, रा. लांडेवाडी, भोसरी), अभिजीत उर्फ सनी भिमराव खंडागळे (वय 30, रा. गुलाबनगर, दापोडी), सचिन रामदास पवार (वय 28, रा. शांतीनगर झोपडपट्टी, भोसरी) चिंचवड ठाण्याच्या हद्दीतील ज्ञानेश्‍वर दशरथ शिंदे (वय 20, रा. नागसेननगर झोपडपट्टी, चिंचवड), प्रदीप बैलाप्पा कांबळे (वय 19, रा. मोरया हौसिंग सोसायटी, चिंचवड), वशिम मुनीर शेख (वय 22, रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माधव उर्फ महादेव रोहिदास गित्ते (वय 25, रा. भगतवस्ती, बालाजीनगर, चाकण) अशी तडीपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांना गुरुवारी (ता.31) दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील शाळांची घंटा वाजणार; महापालिका आयुक्तांनी काढला आदेश

वर्षभरात 93 जण तडीपार 
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून 2020 या वर्षभरात एकूण 93 सराईत गुन्हेगारांना तडीपार केले. यामध्ये परिमंडळ एकमधील 49 तर परिमंडळ दोनमधील 44 गुन्हेगारांचा समावेश आहे. त्याचबरोबर आठ मोक्का कारवाई केल्या असून त्यामध्ये 44 गुन्हेगारांचा समावेश असून दोन जणांवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली. अशाप्रकारे वर्षभरात एकूण 139 सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad 24 criminals deported same day