Anemia : ॲनिमियामुक्त मोहिमेअंतर्गत तपासणी; शहरातील ६५० जणांत लक्षणे

महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत शहरात ‘मिशन अक्षय ॲनिमियामुक्त पीसीएमसी मोहीम’ गेल्या एप्रिलपासून राबविण्यात येत आहे.
Anemia
Anemia Sakal
Summary

महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत शहरात ‘मिशन अक्षय ॲनिमियामुक्त पीसीएमसी मोहीम’ गेल्या एप्रिलपासून राबविण्यात येत आहे.

पिंपरी - केंद्र व राज्य सरकारच्या ॲनिमियामुक्त भारत मोहिमेअंतर्गत एप्रिल २०२२ पासून शहरात सहा महिन्यांच्या मुलांपासून १९ वर्षांच्या मुलांपर्यंत आणि २० ते ४९ वर्षांच्या महिला अशा एक लाख २३ हजार ३२७ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात ६५० जणांना रक्तक्षय (ॲनिमिया) झाल्याचे आढळले. हे प्रमाण केवळ अर्धा टक्का (०.५२ टक्के) आहे. ॲनिमियाची लक्षणे आढळलेल्यांना वयानुसार लोहयुक्त गोळ्या व औषधे देण्यात आली आहेत.

महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत शहरात ‘मिशन अक्षय ॲनिमियामुक्त पीसीएमसी मोहीम’ गेल्या एप्रिलपासून राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अंगणवाडी, महापालिका शाळा, दवाखाने व रुग्णालयांमध्ये ॲनिमियामुक्त कॉर्नर उभारण्यात आले आहेत. त्यामार्फत बालके, युवती व महिलांची आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तपासणी केली जात आहे. त्यांना रक्तक्षय प्रतिबंधात्मक लोहयुक्त औषधे व गोळ्या दिल्या जात आहेत.

ॲनिमियामुक्त भारत मोहिमेच्या धर्तीवर महापालिकेतर्फे ‘मिशन अक्षय ॲनिमियामुक्त पीसीएमसी मोहीम’ अंगणवाडी, महापालिका शाळा, दवाखाने व रुग्णालयांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यासाठी ॲनिमियामुक्त कॉर्नर सुरू केले असून प्रतिबंधात्मक लोहयुक्त औषधे व गोळ्या दिल्या जात आहेत. तसेच, प्रत्येक आठवड्यातील सोमवारी विद्यार्थ्यांस लोहयुक्त गोळी सेवन करण्यासाठी द्याव्यात, अशा सूचना सर्व शाळांमार्फत वर्गशिक्षकांना दिल्या आहेत.

- डॉ. पवन साळवे, आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, महापालिका

उपाययोजना

  • तपासणीत रक्तक्षय आढळल्यास तातडीने उपचार

  • सहा महिने ते ५९ महिन्यांच्या बालकांना लोहयुक्त सिरप

  • पाच ते १० वर्षांच्या विद्यार्थ्यांना लोहयुक्त गुलाबी गोळ्या

  • ११ ते १९ वर्षांतील मुलांना लोहयुक्त निळ्या गोळ्या

  • २० ते ४९ वर्षातील महिलांना लोहयुक्त लाल गोळ्या

ॲनिमियाची लक्षणे

  • शरीर, त्वचा पांढरी पडणे, निस्तेज होणे

  • चक्कर येणे, थकवा जाणवणे

  • छातीत धडधडणे, श्वासाची गती वाढणे

  • भूक मंदावणे, धाप लागणे

  • हात, पाय, चेहऱ्यावर सूज येणे

ॲनिमियाचे परिणाम

  • रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होणे

  • शारीरिक वाढ योग्य रितीने न होणे

  • शारीरिक कार्यक्षमता कमी असणे

  • बालकांची प्रतिकारशक्ती कमी होणे

  • रोगास बळी पडणे

ॲनिमिया म्हणजे काय?

  • ॲनिमिया म्हणजे रक्तातील तांबड्या पेशींची संख्या व त्यातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे

ॲनिमियाची कारणे

  • अपघात, बाळंतपण, मूळव्याध, शस्रक्रिया, मासिक पाळी यामध्ये अधिक रक्तस्राव होणे

ॲनिमिया कोणाला?

  • बालके, किशोरवयीन मुले-मुली, तरुणी, गर्भवती, नवबाळंत महिलांमध्ये रक्तक्षय समस्या आढळते

ॲनिमिया टाळण्यासाठी

  • संतुलित आहार घेणे, मद्यपान व धुम्रपान टाळणे, रक्तस्राव होऊ नये यासाठी डॉक्टरांकडून उपचार घणे

असे आहेत लाभार्थी

  • ६ ते ५९ महिन्यांचे बाळ - २४,६५१

  • ५ ते १० वर्षांची मुले - ३०,४८२

  • ११ ते १९ वर्षांची मुले - ३१,१५६

  • २० ते ४९ वर्षांतील महिला - ३२,६६९

  • गर्भवती व बाळंत महिला - ४,३६९

इथून वाटल्या लोहयुक्त गोळ्या

  • महापालिका दवाखाने - २७

  • महापालिका रुग्णालये - ८

  • माध्यमिक शाळा - १८

  • प्राथमिक शाळा - ११०

  • बालवाड्या, अंगणवाड्या - २०५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com