esakal | पिंपरीत रविवारी लसीचा दुसरा डोस मिळणार ‘ऑन द स्पॉट’
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

पिंपरीत रविवारी लसीचा दुसरा डोस मिळणार ‘ऑन द स्पॉट’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘कोव्हिशील्ड’ (covishield) आणि ‘कोव्हॅक्सिन’ (covaxine) लशींचा पुरेसासाठा उपलब्ध असल्याने रविवारी (ता.५) लसीकरण करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी दुसरा डोसचे निश्चित दिवस पूर्ण केले आहेत. त्यांना सर्व लसीकरण केंद्रावर ‘ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप’ पद्धतीने डोस मिळणार आहे. त्यांनी महापालिकेच्या वॉर्डनिहाय केंद्रीय किओक्स (KIOSK) टोकन प्रणाली किंवा कोविन अॅपव्दारे ऑनलाइन स्लॉट बुकिंग करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत करण्यात येईल. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी रविवारी सकाळी आठ वाजता स्लॉट बुकिंग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कूल, भोसरी, प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल, आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, खिंवसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे या केंद्रावर देण्यात येईल. लसीकरण केंद्रावर स्तनदा व गरोदर महिलांसाठी काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यांना ‘ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप’ या पद्धतीने लसीकरण करण्यात येईल.

हेही वाचा: बजाज फाउंडेशन करणार शहरातील भटक्या श्‍वानाचे मोफत निर्बिजीकरण

याठिकाणी ‘कोव्हॅक्सिन’

प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल,आकुर्डी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय , चिंचवड, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल,जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, यमुनानगर रुग्णालय, जुने जिजामाता रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, निळू फुले नाटय गृह, पिंपळे गुरव या लसीकरण केंद्रावर ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस मिळणार आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये १९३ नवीन रुग्ण

कोविन अॅपव्दारे पहिला व दुसरा डोस

प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी , क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय , चिंचवड, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी, जुने जिजामाता रुग्णालय, निळू फुले नाटय गृह, पिंपळे गुरव, आचार्य अत्रे सभागृह या केंद्रावर पहिला डोस कोविन अॅपव्दारे ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने ५ तर वॉर्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे २० लाभार्थी व उर्वरित सर्व लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व्दारे डोस मिळू शकतो, तर दुसरा डोसदेखील त्याप्रमाणेच मिळणार असल्याची माहिती सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

loading image
go to top