Pimpri chinchwad crime : विजयी संघातील खेळाडूला पिंपरीत बॅटने बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजयी संघातील खेळाडूला पिंपरीत बॅटने बेदम मारहाण

विजयी संघातील खेळाडूला पिंपरीत बॅटने बेदम मारहाण

पिंपरी : क्रिकेट सामन्यात विजयी झालेल्या संघातील खेळाडूला विरोधी संघातील खेळाडूने बॅटने बेदम मारहाण केली. ‘मी आताच जामिनावर सुटून आलो आहे. मला दुसरा पण खेळ खेळता येतो. तुला दुसरा खेळ दाखवू काय’, अशी धमकीही दिली. हा प्रकार पिंपरीतील रसरंग चौकाजवळ घडला.

हेही वाचा: NZ vs SCO : टीम इंडियाला जे जमलं नाही ते स्कॉटलंडनही करुन दाखवलं!

सलमान शेख (वय ३०, रा. विठ्ठलनगर, पिंपरी), समीर पठाण (वय २८) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सुमीत सुधाकर शेट्टी (वय २१, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी (ता. ९) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास फिर्यादी व आरोपी यांचा क्रिकेटचा सामना झाला. यामध्ये फिर्यादीची टीम विजयी झाली.

हेही वाचा: 'बिग बॉस' होणार बंद, कारण...

त्यामुळे विजयी टीम जल्लोष करत असताना आरोपी सलमान बॅट घेऊन धावत शिवीगाळ करीत फिर्यादीकडे आला व त्याला धमकी देत बॅटने मारले. आरोपी समीर यानेही फिर्यादीला दगडाने मारून जखमी केले. त्यानंतर आरोपींच्या इतर साथीदारांनी फिर्यादीला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top