'बिग बॉस' होणार बंद, कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bigg boss season 15
'बिग बॉस' होणार बंद, कारण...

'बिग बॉस' होणार बंद, कारण...

मुंबई - टीव्ही मनोरंजन वाहिनीवरील सर्वात वादग्रस्त आणि मनोरंजक शो म्हणून बिग बॉसचे नाव घेतले जाते. या शो नं आतापर्यत सर्वाधिक प्रेक्षकांची संख्या तयार केली आहे. यंदा या रियॅलिटी शो चा 15 वा सीझन सुरु आहे. मात्र हा सीझन वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा सीझन बंद होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका वादात सापडली आहे. त्यातील सहभागी स्पर्धकांनी अनेक वाद तयार केले आहेत. त्यामुळे या मालिकेनं प्रेक्षकांची नाराजीही ओढावून घेतल्याचे सांगण्यात आले आहे. वास्तविक हा रियॅलिटी शो यशस्वी व्हावा यासाठी कित्येक कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.

यावेळी बिग बॉसचा टीआरपी सर्वात खाली आला आहे. हा रियॅलिटी शो कमी होण्यामागील कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा शो नियोजित वेळेपेक्षा अगोदरच बंद होणार असल्याची चर्चाही सुरु झाली आहे. कारण हा शो सुरु झाल्यानंतर तिसऱ्या आठवड्यातच त्याची लोकप्रियता कमी झाली. हे त्याच्या निर्मात्यांसाठी धक्कादायक होतं. त्यामुळे शो ची लोकप्रियता वाढावी यासाठी काय करावं असा प्रश्न मेकर्सनं पडला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धक यांची फी, आणि सलमान खानचं मानधन असं सगळं मिळून 500 कोटी रुपयांचा खर्च होत असल्याचे दिसून आले आहे. हे सगळे पैसे वसूल कऱण्यासाठी निर्मात्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे.

बिग बॉसचा भरकटलेला ट्रॅक पुन्हा जागेवर आणण्यासाठी मेकर्स सातत्यानं प्रयत्नशील आहेत. मात्र अजूनही त्यांना त्यात यश आले आहे. गेल्या आठवड्यामध्ये जो मोठा टीआरपी मिळाला होता. त्याच्यापेक्षाही कमी टीआरपी मिळाल्यानं आता हा शो बंद करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून या शो मध्ये वेगवेगळे सेलिब्रेटी आणून तो शो लोकप्रिय कसा होईल यादृष्टीनं विचार केला जात आहे. गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात स्पर्धकांचा जो वाद झाला त्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

loading image
go to top