esakal | पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड निर्णायक भूमिकेत
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri Chinchwad BJP has registered 18 thousand graduate voters in the city

या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर मतदारांच्या नोंदणीचे काम सुरू केले होते.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड निर्णायक भूमिकेत

sakal_logo
By
अविनाश म्हाकवेकर

पिंपरी : पुणे पदवीधर विधानसभा मतदारसंघ जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करणाऱ्या पिंपरी-चिंचवड भाजपने शहरातील तब्बल 18 हजार पदवीधर मतदारांची नोंदणी करून घेतली आहे. विशेष म्हणजे प्रदेश भाजपने पिंपरी-चिंचवड भाजपला 15 हजार पदवीधर मतदारांच्या नोंदणीचे उद्दीष्ट दिले होते. त्यापेक्षा अधिकच्या 15 हजार पदवीधर मतदारांची नोंदणी करून पदवीधर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आमची भूमिका निर्णायक असेल, हे पिंपरी-चिंचवड भाजपने स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा : अर्णब गोस्वामी यांना अटक प्रकरणावरुन रुपाली चाकणकर यांचे ट्विट

निवडणुकीची भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर मतदारांच्या नोंदणीचे काम सुरू केले होते. पिंपरी-चिंचवड भाजपला शहरातील 15 हजार नोंदणी करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यानुसार पिंपरी-चिंचवड भाजपचे अध्यक्ष व आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने नोंदणीचा कार्यक्रम आखून काम केले. 

हे ही वाचा : दुधाच्या कॅनमधून ताडी वाहतूक करणाऱ्या पिकअपवर पोलिसांची कारवाई

नोंदणीसाठी पिंपरी-चिंचवड नोंदणीप्रमुख म्हणून पक्षाचे शहर संघटक सरचिटणीस अमोल थोरात यांची नेमणूक करण्यात आली होती. तसेच चिंचवड विधानसभा नोंदणीप्रमुखपदी मोरेश्वर शेडगे, पिंपरी विधानसभा नोंदणीप्रमुखपदी राजू दुर्गे, भोसरी विधानसभा प्रमुखपदी विजय फुगे यांना जबाबदारी देण्यात आली होती. या सर्व विधानसभा प्रमुखांनी प्रभागांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना समन्वयक म्हणून नेमले होते. या सर्वांनी गेल्या दहा दिवसातच व्हर्चुअल सभा, प्रभाग सभा, बैठका व वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातून नगरसेवक व कार्यकर्ते यांच्याशी प्रत्यक्षत संपर्क साधून ऑफलाईन व ऑनलाईन माध्यमातून प्रदेश भाजपने दिलेल्या उद्दिष्टपेक्षाही जास्त हजार पदवीधरांच्या नोंदणीचा टप्पा ओलांडला आहे. 

शहर भाजपाच्या वतीने एक नोव्हेंबर रोजी संपूर्ण शहरात पदवीधर मतदार नोंदणी महाअभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बूथ स्तरावर प्रमुख सोसायट्या, चाळी, वस्त्या असा सुमारे ठिकाणी बूथ लावून एकाच दिवशी एकाच वेळी सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत नोंदणी अभियान राबविले.

संपादन - सुस्मिता वडतिले