पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी 183 नवीन रुग्ण; दोन रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी 183 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 97 हजार 973 झाली आहे. आज 163 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 94 हजार 479 झाली आहे. सध्या एक हजार 722 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील कोणाचाही मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब ठरली. मात्र, शहराबाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी 183 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 97 हजार 973 झाली आहे. आज 163 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 94 हजार 479 झाली आहे. सध्या एक हजार 722 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील कोणाचाही मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब ठरली. मात्र, शहराबाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

पुणे : 2 फरार आरोपी जेरबंद; बिनविरोध निवडून आल्यावर केला होता हाफ मर्डर

आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 772 झाली आहे. तर, शहराबाहेरील 738 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इंग्लंडहून आलेले व मुंबई विमानतळावर उतरलेल्या शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 188 प्रवाशांची तपासणी केली असून 181 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. एकूण सात जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. 50 प्रवाशी बाहेरगावी गेले आहेत. निगेटीव्ह आढळलेल्या सात जणांचे नमुने स्ट्रेन तपासणी (नवीन कोरोना) अर्थात जिनोम सिक्केसिंगसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यातील तीन रिपोर्ट निगेटीव्ह व तीन रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. एक रिपोर्ट प्रतीक्षेत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या महापालिका रुग्णालयांत 575 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 149 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 539 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील एक हजार 603 जणांची तपासणी केली. 838 जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 95 हजार 96 जणांचे विलगीकरण करण्यात आले.

आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष मारुंजी (वय 62) व मुहिला आळंदी (वय 74) येथील रहिवासी आहेत.

यू आर सस्पेन्डेड; पुण्यात बिल्डरच्या खुन्यासोबतच हवालदारानं केली बैठक

आज दोन हजार 584 संशयित रुग्णालयात दाखल झाले. दोन हजार 71 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तीन हजार 424 जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. दोन हजार 5623 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आजपर्यंत पाच लाख 76 हजार 912 संशयित रुग्णालयात दाखल झाले. चार लाख 77 हजार 515 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. पाच लाख 72 हजार 951 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad City 183 New Corona Virus Patient