Sakal Vidya : स्पर्धा परीक्षांबाबत शनिवारी चिंचवडमध्ये मार्गदर्शन

राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षा आणि एनएसओ, आयएमओ, एनटीएसई, होमी भाभा परीक्षांची तयारी कशी करावी?, त्यांचा अभ्यासक्रम, याबाबत बहुतांश विद्यार्थी व पालकांना माहिती नसते.
sakal vidya
sakal vidyasakal
Summary

राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षा आणि एनएसओ, आयएमओ, एनटीएसई, होमी भाभा परीक्षांची तयारी कशी करावी?, त्यांचा अभ्यासक्रम, याबाबत बहुतांश विद्यार्थी व पालकांना माहिती नसते.

पिंपरी - राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षा आणि एनएसओ, आयएमओ, एनटीएसई, होमी भाभा परीक्षांची तयारी कशी करावी?, त्यांचा अभ्यासक्रम, याबाबत बहुतांश विद्यार्थी व पालकांना माहिती नसते. अशा परीक्षांसह इंजिनिअरिंग, मेडिकल व सायन्समधील करिअरच्या संधी व प्रवेश परीक्षांबाबत शनिवारी (ता.२९) सांयकाळी पाच वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात चर्चासत्र आयोजित केले आहे.

‘सकाळ विद्या’ व एक्सलंट एज्युकेशन (इएक्सइडी) यांच्यातर्फे आयोजित चर्चासत्रात, इंजिनिअरिंग, मेडिकल व विज्ञान शाखेतील शिक्षण आणि प्रवेश; सहावीपासूनच राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षांची तयारी का व कशी करावी?. एनएसओ, आयएमओ, एनटीएसई, होमी भाभा अशा परीक्षांचे स्वरूप व अभ्यासक्रम, त्यांची तयारी; आगामी काळात अभ्यासक्रमात होणारे बदल; अकरावी, बारावीसह सीईटी, जेईई, नीट परीक्षांची तयारी, अभ्यासक्रमाचे नियोजन; देशातील नामांकित संस्था आयआयटी, एनआयटी, बीआयटी, व्हीआयटी, आयआयएससी, आयआयएसइआर, एनआयएसइआर व त्यांची प्रवेश प्रक्रिया याबाबतच्या शंकांचे निरसन चर्चासत्रातून होणार आहे. करिअर व समुदेशन क्षेत्रातील २० वर्षांचा अनुभव असलेले प्रा. आशिष दुबे मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाबाबत...

  • काय? कधी? केव्हा? कुठे?

  • काय? : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रम तयारी

  • कधी? : शनिवार, ता. २९ एप्रिल २०२३,

  • केव्हा? : सांयकाळी पाच वाजता

  • कुठे? : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

प्रवेश

  • विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य

  • नावनोंदणी आवश्यक

  • प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

संपर्क

सचिन : ९७३०९५९६९९

रोशन : ९५४५९८११५९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com