esakal | पिंपरीकरांनो अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही 
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri chinchwad corona update 244 new patients 21 october

पिंपरी-चिंचवडमधील बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 82 हजार 317 झाली आहे. सध्या दोन हजार 304 सक्रिय रुग्ण आहेत.

पिंपरीकरांनो अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 244 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 86 हजार 114 झाली आहे. आज 119 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 82 हजार 317 झाली आहे. सध्या दोन हजार 304 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एक आणि शहराबाहेरील दोन अशा तीन रुग्णांचा मृत्यू झाला. 

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 493 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 616 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष भोसरी (वय 57) आणि शहराबाहेरील पुरुष औरंगाबाद (वय 70), वडगाव मावळ (वय 52) येथील रहिवासी आहेत. 

आणखी वाचा - 'खडसेंचे राजकारण उतारवयाचे; पक्षाला फरक पडत नाही'

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत शहरात एक हजार 314 पथकांद्वारे सर्वेक्षण सुरू आहे. गेल्या पाच दिवसांत 15 लाख 29 हजार 819 जणांचे सर्वेक्षण केले. तीन हजार 592 जणांना कोरोनाची लक्षणे आढळली. त्यांच्या घशातील द्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 121 जण पॉझिटीव्ह आढळले आहेत.